New Year 2024 : न्यू इयर पार्टीला जाण्यापूर्वी अशी घ्या त्वचेची काळजी

आज २०२३ या वर्षातील शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वजण काहीतरी प्लॅन करतात. काही जण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात तर काही जण न्यू इयर पार्टीचे आयोजन करतात.
New Year 2024
New Year 2024esakal
Updated on

New Year 2024 : आज २०२३ या वर्षातील शेवटचा दिवस आहे. आपण सर्वजण उद्या नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. आज २०२३ या वर्षातील शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वजण काहीतरी प्लॅन करतात. काही जण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात तर काही जण न्यू इयर पार्टीचे आयोजन करतात.

या न्यू इयर पार्टीला जाण्यासाठी महिला खास तयारी करतात. पार्टीवेअर आऊटफिट्सपासून ते मेकअपर्यंतची ही तयारी असते. मात्र, या सगळ्यात तुम्ही त्वचेची देखील खास काळजी घेणे महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला खास न्यू इयर पार्टीसाठी त्वचेची कशी काळजी घ्यायची? त्याच्या टिप्स सांगणार आहोत.

New Year 2024
Sunflower Oil for Skin : त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी लाभदायी आहे सूर्यफूलाचे तेल, जाणून घ्या 'हे' फायदे

त्वचेला हायड्रेटेड ठेवा

हिवाळ्यात त्वचा अधिक कोरडी आणि रूक्ष होते. त्यामुळे, त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. खास करून पार्टीला जाण्यापूर्वी तुमची त्वचा हायड्रेटेड असणे खूप गरजेचे आहे. त्वचेवर लोशन्स आणि मॉईश्चरायझर्स लावण्यासोबत तुम्ही भरपूर पाणी देखील प्यायला हवे. यामुळे, त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.

चेहऱ्याचे करा स्क्रबिंग

न्यू इयर पार्टीला चेहऱ्यावर ग्लो दिसण्यासाठी तुम्ही मेकअप करण्यासोबतच स्किनकेअर रूटीन देखील चांगल्या प्रकारे फॉलो करायला हवे. यासाठी चेहऱ्याचे स्क्रबिंग करणे महत्वाचे आहे.

चेहऱ्यावरील रोमछिद्रांमध्ये साचलेली घाण काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे फायद्याचे ठरते. स्क्रबिंग केल्याने चेहऱ्यावरील धूळीचे कण, ब्लॅकहेड्स, घाण, आणि मृत त्वचा काढली जाते. त्यामुळे, चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ होतो. न्यू इयर पार्टीला जाण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्याचे स्क्रबिंग करून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढून चेहरा स्वच्छ करू शकता.

फेसपॅकची घ्या मदत

चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ केल्यानंतर चेहऱ्यावर फेसपॅक लावणे गरजेचे आहे. तुम्ही घरच्या घरी फेसपॅक बनवू शकता किंवा मार्केटमध्ये आजकाल अनेक प्रकारचे फेसपॅक्स मिळतात. परंतु, तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या फेसपॅकचा वापर करा.

कॉफी, मध, बेसन, तांदळाचे पीठ, हळद, दूध, कोरफड इत्यादी घरातील गोष्टींचा वापर करून तुम्ही फेसपॅक बनवू शकता. या फेसपॅकचा वापर केल्यावर चेहऱ्यावर सुंदर ग्लो येण्यास मदत होईल.

New Year 2024
Skin Care Tips : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी संत्र्याची घ्या मदत, बनवा 'हे' फेसपॅक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.