Hair Care Tips : फ्रिझी केसांमुळे त्रस्त आहात? मग, 'या' आयुर्वेदिक टिप्सची घ्या मदत

केस फ्रिझी झाले की मग केसांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंता होतो.
Hair Care Tips
Hair Care Tipsesakal
Updated on

Hair Care Tips : हिवाळ्यात आरोग्यासोबतच त्वचेची आणि केसांची खास काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच केसांच्या ही समस्या वाढतात. हवेतील थंडाव्यामुळे केस कोरडे होणे, केस फ्रिझी होणे इत्यादी समस्या सुरू होतात.

केस फ्रिझी झाले की मग केसांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंता होतो आणि केस खराब दिसू लागतात. मात्र, आता तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. केसांचा हा फ्रिझीपणा कमी करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक वनस्पतींची मदत घेऊ शकता.

अश्वगंधा

अश्वगंधा ही आयुर्वेदातील अतिशय महत्वपूर्ण आणि औषधी वनस्पती आहे. अश्वगंधाच्या मदतीने तुम्ही केसांमधील कोरडेपणा दूर करू शकता. यामुळे, केसांमध्ये वाढणाऱ्या कोंड्यापासून ही तुम्हाला आराम मिळू शकतो.

अनेक आजारांवरील औषधांमध्ये ही अश्वगंधा या वनस्पतीचा वापर केला जातो. अश्वगंधाचा वापर हा तेल, हेअर मास्क किंवा शॅंम्पूमध्ये ही केला जातो. अश्वगंधामध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे केसांच्या मुळांना मजबूती मिळते आणि टाळूवरील कोंडा निघून जाण्यास मदत होते.

तसेच, अश्वगंधाचा वापर हा तेल आणि हेअर मास्कच्या रूपात केल्याने केस मऊ होतात आणि केसांमधील फ्रिझीनेसपणा कमी होतो.

Hair Care Tips
Hair Care Tips : केस पातळ झाले आहेत का? मग, ‘या’ होममेड हेअरमास्कची घ्या मदत

असा करा अश्वगंधाचा वापर

नारळाच्या तेलामध्ये २ चमचे अश्वगंधा घालून या तेलाने केसांना मसाज करा. त्यानंतर, ३० मिनिटांनी केस माईल्ड शॅंम्पूने धुवा. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा तुमच्या केसांवर हा उपाय करा.

शतावरी

हिवाळ्यात वातावरणातील बदलाचा परिणाम केसांवर होतो. त्यामुळे, केस फ्रिझी होणे, कोरडे होणे आणि केसांचा व्हॉल्यूम कमी होणे इत्यादी सर्व गोष्टींवर परिणाम होतो. शतावरी आपल्या आरोग्यासाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

शतावरीमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे केसांची मूळे मजबूत होतात आणि केसांमधील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. तेल, शॅंम्पू आणि हेअर मास्कच्या रूपात शतावरीचा वापर केल्याने केस गळती देखील कमी होते.

असा करा शतावरीचा वापर

शतावरीचा उपाय केसांवर करण्यासाठी २ चमचे शतावरी पावडरमध्ये १ चमचा आवळा पावडर मिसळा आणि त्यात २ चमचे दही मिसळा आता तुमचा हेअर मास्क तयार आहे. हा हेअर मास्क ३० मिनिटांसाठी केसांना लावा. त्यानंतर केस धुवून टाका.

Hair Care Tips
Oily and Greasy Hair Problems : तेलकट आणि चिकट केसांपासून सुटका करायची आहे? मग, ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.