Parenting Tips : मुलांचा सतत मूड बदलतोय? मग, 'या' पद्धतीने करा हॅंडल

लहान मुलांची काळजी घेणे, त्यांचा सांभाळ करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. पालकांना ही जबाबदारी सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. तुम्ही मुलांना जे वळण लावाल, त्याच्याशी मुले भविष्यात जुळवून घेतात.
Parenting Tips
Parenting Tipsesakal
Updated on

Parenting Tips : लहान मुलांची काळजी घेणे, त्यांचा सांभाळ करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. पालकांना ही जबाबदारी सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. तुम्ही मुलांना जे वळण लावाल, त्याच्याशी मुले भविष्यात जुळवून घेतात.

जर तुमच्या घरात रोज भांडणे होत असतील किंवा आसपास वाद-विवाद होत असतील तर याचा चुकीचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. यामुळे मुले हट्टी होतात आणि त्यांचा मूड सतत बदलत राहतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये मुलांना हॅंडल करणे अतिशय आव्हानात्मक असते.

जर तुमच्या ही मुलांचा सतत मूड बदलत असेल तर त्यांना हॅंडल कसे करावे? याच्या टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Parenting Tips
Parenting Tips : मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी मुलांना जरूर शिकवा ‘या’ गोष्टी

मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या

मूडी मुलांना व्यवस्थितपणे हॅंडल करण्यासाठी सर्वात आधी त्यांना त्यांचे विचार, भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्या. त्यांना अडवू नका. जेणेकरून तुमची मुले कोणत्याही भीतीशिवाय त्यांच्या भावना तुमच्यासोबत शेअर करू शकतील.

मुलांमध्ये प्रत्येक क्षणी मूड बदलताना दिसत असतील, तर यामागे त्यांच्या मनात दडपलेल्या भावना असू शकतात. त्यामुळे, त्यांच्या भावना त्यांना व्यक्त करू द्या. ते स्वातंत्र्य पालकांनी मुलांना द्यायला हवे. यासाठी पालकांनी शांतपणे बसून मुलांशी चर्चा करायला हवी.

घरातील वातावरण सकारात्मक ठेवा

मुलांचा सतत मूड बदलण्यामागे अनेकदा घरातील वातावरण देखील कारणीभूत असू शकते. त्यामुळे, घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यावर पालकांनी भर द्यावा. जर तुमच्या घरात सतत भांडणे, वाद-विवाद होत असेल तर याचा परिणाम मुलांवर होणे स्वभाविक आहे.

अशा स्थितीमध्ये मुले चिडचिड करू लागतात आणि त्यांना राग येतो. या सगळ्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे, पालकांनी घरातील वातावरण सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा आणि थोरांचा आदर, एकत्र राहण्याची सवय मुलांच्या संगोपनात भरपूर फायदेशीर ठरते.

पालकांनो हायपर होऊ नका

मुलांचा सतत मूड बदलत असेल तर अशावेळी पालकांनी त्यांचा मूड खराब करू नये. सर्वात महत्वाची बाब म्हणजे मुलांच्या अशा वागण्यावर त्वरीत प्रतिक्रिया देऊ नका, हायपर होणे टाळा. मुलांच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

परंतु, यामुळे, पालकांनी मुलांवर चिडचिड करणे, रागावणे किंवा हात उचलणे पूर्णपणे चुकीचे आहे. याचा गंभीर परिणाम मुलांवर होऊ शकतो. अशा स्थितीमध्ये पालकांनी मुलांना शांत करावे आणि त्यांचा मूड सतत का बदलतोय? याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करावा. मुलांचा मूड सतत का खराब होतोय आणि त्यांना राग का येतोय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न पालकांनी करावा.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांचा आत्मविश्वास कमी झाला आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.