Hair Care Tips : दिवसभरात तुमची हेअरस्टाईल बिघडून जातेय? मग, ‘या’ टीप्स करा फॉलो

बिघडलेल्या हेअरस्टाईलमुळे तुमचा पूर्ण लूक खराब दिसू शकतो.
Hair Care Tips
Hair Care Tipsesakal
Updated on

Hair Care Tips : जेव्हा आपण कुठे ही बाहेर जातो. त्यावेळी, आपला लूक सुंदर दिसावा असे प्रत्येक महिलेला वाटते. मग, हा लूक सुंदर ठेवण्यासाठी आपण कोणतीच कसर सोडत नाही. मेकअपपासून ते हेअरस्टाईलपर्यंत आणि कपड्यांपासून ते फूटवेअरपर्यंत आपण सर्व गोष्टींची काळजी घेतो. त्याकडे, विशेष लक्ष देतो.

मात्र, एवढ लक्ष देऊनही आपला लूक कुठेतरी खराब होतो. खास करून केसांच्या बाबतीत ही समस्या निर्माण होते. हेअरस्टाईल दिवसभरात बिघडून जाते, त्यामुळे, लूक कितीही चांगला केला असला तरी फक्त बिघडलेल्या केसांमुळे तुमचा मूड ऑफ होतो आणि लूक खराब दिसतो.

परंतु, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, आज आम्ही तुम्हाला खास टीप्स सांगणार आहोत. या टीप्सच्या मदतीने तुमची हेअरस्टाईल दिवसभर व्यवस्थित राहील. ती अजिबात बिघडणार नाही.

Hair Care Tips
Rosemary Oil for Hairs : लांब आणि घनदाट केसांसाठी फायदेशीर आहे रोझमेरी ऑईल, जाणून घ्या ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

केसांना वारंवार स्पर्श करू नका

केसांची छान हेअरस्टाईल केल्यानंतर आपण केसांना वारंवार स्पर्श करतो. जेणेकरून केस व्यवस्थित आहेत ना, ते नीट सेट केलेले आहेत ना? या खात्रीसाठी केसांना स्पर्श करतो. मात्र, असे केल्याने केसांची हेअरस्टाईल बिघडते.

आपल्या हातामध्ये जो घाम असतो किंवा हात तेलकट असतात. त्यामुळे, जेव्हा केसांना हात लावतो त्यावेळी हातावरील घाम आणि तेलकटपणा त्या केसांमध्ये उतरतो. त्यामुळे, देखील केस खराब होतात आणि हेअरस्टाईल बिघडून जाते. त्यामुळे, हेअरस्टाईल व्यवस्थित ठेवण्यासाठी केसांना वारंवार स्पर्श करणे टाळा.

टचअप प्रॉडक्ट्स सोबत ठेवा

अनेक तरूणींना असे वाटते की, काही वेळानंतर केसांची हेअरस्टाईल खराब होणार आहे किंवा केस विस्कटणार आहेत. अशा स्थितीमध्ये तुम्ही सोबत एक टचअप प्रॉडक्ट सोबत ठेवा.

कारण, जेव्हा तुम्हाला असे वाटेल की, आता हेअरस्टाईल खराब होणार आहे, तेव्हा अशावेळी या टचअप प्रॉडक्ट्सचा झटपट वापर करा आणि तुमची हेअरस्टाईल व्यवस्थित ठेवा.

ओलसर केसांवर हेअर प्रॉडक्ट्सचा वापर करा

ही खर तर एक छोटीशी आणि सोपी टीप आहे. परंतु, ही टीप तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरू शकते. जेव्हा तुम्ही ओलसर केसांवर हेअर प्रॉडक्ट्सचा वापर करता, तेव्हा ते केसांना एकसमान पद्धतीने लागू होते.

अशा स्थितीमध्ये मग तुमची हेअरस्टाईल देखील चांगली राहते. त्यामुळे, ओलसर केसांवर हेअर प्रॉडक्ट्सचा वापर करणे फायदेशीर ठरते. परंतु, जास्त ओल्या किंवा पूर्णपणे कोरड्या केसांवर हेअर प्रॉडक्ट्सचा वापर करणे टाळा.

Hair Care Tips
Hair Split Ends : हिवाळ्यात केसांमध्ये वारंवार फाटे फुटतात? मग, ‘या’ होममेड हेअर मास्कची घ्या मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.