Hair Care Tips : केसांचे आरोग्य हेल्दी ठेवण्यासाठी केसांची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात तर वातावरणातील बदलांमुळे आरोग्याची, केसांची आणि त्वचेची खास काळजी घ्यावी लागते.
हिवाळ्यात केस आणि त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे, खास काळजी घेणे गरजेचे असते. जर केसांकडे दुर्लक्ष केले तर केस अधिक कोरडे आणि फ्रिझी होण्यास सुरूवात होते. या कोरड्या केसांमुळे, मग केसांमध्ये गुंता अधिक वाढतो आणि केस निस्तेज दिसू लागतात.
हिवाळ्यात कोरड्या आणि फ्रिझी केसांची समस्या मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे, ही समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही काही टीप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. या टीप्सच्या मदतीने तुमचे कोरडे आणि फ्रिझी केस मऊ होण्यास मदत मिळेल.
हिवाळ्यात अनेक जण वातावरणातील बदलामुळे गरम पाण्याने केस धूतात. मात्र, गरम पाण्याने केस धुतल्यामुळे, केस अधिक कोरडे आणि फ्रिझी होतात. त्यामुळे, ही समस्या टाळण्यासाठी केस योग्य पद्धतीने धुवा, त्यासाठी तुम्ही पाण्याचे तापमान सामान्य ठेवून या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करा.
केसांमध्ये फाटे फुटल्यामुळे केस अधिक खराब दिसू लागतात. शिवाय, या फाटे फुटलेल्या केसांमुळे केसांची वाढ रोखली जाते. त्यामुळे, केसांच्या वाढीमध्ये ही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, केसांचे ट्रिमिंग करणे महत्वाचे आहे.
जर हे खराब केस तुम्ही ट्रिम केले नाहीत तर कोरड्या आणि फ्रिझी केसांच्या समस्येमध्ये अधिक भर पडते. त्यामुळे, केसांचे ट्रिमिंग अवश्य करा. केसांचे ट्रिमिंग केल्यानंतर खराब केसांची समस्या दूर होण्यास मदत होईल.
जर तुमचे केस खूपच फ्रिझी आणि कोरडे झाले असतील तर केसांमध्ये मुलायमपणा (मऊपणा) आणण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्कचा वापर करा. हेअर मास्कचा वापर केल्यामुळे, केसांना योग्य पोषण ही मिळेल आणि केस मऊ होतील.
हेअर मास्कमुळे टाळूला ही पोषण मिळते आणि केस हायड्रेटेड राहण्यास मदत होते. यासाठी, तुम्ही नारळ तेल, ऑलिव्ह ऑईल आणि दही इत्यादी घरगुती उपायांचा ही वापर करू शकता. यामुळे, कोरडे आणि फ्रिझी केस मऊ होण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.