Lifestyle Tips: म्हातारपणाआधीच स्वत:ला म्हातारं बनवू नका, आजच सोडा 'या' सवयी

३०-४० वर्षानंतरही स्वत:ला ठेवा फिट
Healthy Lifestyle
Healthy Lifestyleesakal
Updated on

Health: अनेक लोक तिशी किंवा पस्तीशीनंतर स्वत:ला निरुत्साही करून घेतात. असे लोक आपलं आता वय झालंय असा स्वत:चाच गैरसमज करून घेत असतात. मात्र या वयात तुमचाही जर का असा गैरसमज असेल तर तो आजच दूर करा. जवळपास १०० पैकी ९९ टक्के लोक महत्वाच्या सात चुका करतात. जाणून घेऊया या चुका कोणत्या ते.

३० ते ४० च्या वयोगटात प्रवेश केल्यानंतर लोक स्वत:कडे दूर्लक्ष करतात. या वयोगटातील लोकांमध्ये तुम्हाला उत्साह कमी झालेला दिसून येईल. तसेच त्यांना सगळंच येतं असाही त्यांचा गैरसमज होतो आणि त्यामुळे नवं काही शिकण्याची उर्मी देखील त्यांच्यात नसते. त्यात तुमच्या अशा काही सवयी तुम्हाला वारंवार तुमचं वय झाल्याची जाणीव करून देत राहातात.

१. तुम्हाला सगळं काही माहिती असल्याची सवय बदला

तुम्ही सगळं काही शाळेतच शिकले आहात तुम्हाला नवं काही शिकण्याची गरजच नाही ही विचारसरणी आधी बदला. तसेच तुम्ही तुमच्या शाळेत किंवा डिग्री लेवलला घेतलेल्या शिक्षणानंतर तुम्हाला संपूर्ण जगाचं ज्ञान मिळालं ही विचारसरणी मुळात चुकीची आहे. असे केल्यास तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येणार नाही.

Healthy Lifestyle
Food: सायंकाळच्या चहासोबत ट्राय करावी अशी ‘चटपटीत पंजाबी तडका मॅगी’

२. तुम्हाला आवडत नसलेली नोकरी किंवा काम करू नका

तुम्हाला नोकरीत भरपूर पैसे मिळत असेल पण तुम्ही खुश नसाल तर त्याचा तुम्हाला आणखी जास्त त्रास होईल. त्यामुळे कायम तुमची निवड ही तुमच्या आवडीच्या कामासाठीच असावी.

Healthy Lifestyle
Healthy Lifestyle: वजन कमी करायचं? जेवणात 'या' भाज्यांचा समावेश करा

३. स्थूल जीवनशैली

तुम्ही जर दिवसातील जास्तीत जास्त वेळ बसून घालवत असाल तर ती सवय आजच सोडा. त्यामुळे तुमचं मेटाबोलिझम कमी होतं. त्यामुळे तीस वर्षानंतर तुमचं वजन वाढण्यास सुरूवात होते. तुम्ही तीस वर्षाखालील असाल आजपासूनच काळजी घ्या.

Healthy Lifestyle
PM Modi Lifestyle: 72 वर्षाच्या वयातही पीएम मोदी आहेत अगदी फिट; काय आहे त्यांचं फिटनेस सिक्रेट?

४. वाईट सवयींना आळा घाला

प्रत्येक व्यक्तीत काही चांगल्या तर काही वाईट सवयी असतात. सतत फास्ट फूड खाणे, मद्यपान करणे टाळा. तीशीनंतर तुमचं मेटाबोलिझम कमी झाल्याने या सवयी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.