Water Lilies: काय आहे वॉटर लिली?

Water Lilies: प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये आजकाल अनेक जण वॉटर लिली लावतात. वॉटर लिली तुम्ही घरात इनडोअर प्लांट म्हणून लावू शकता किंवा बाहेर देखील लावू शकता.
Water Lilies:
Water Lilies:Sakal
Updated on

Water Lilies: वॉटर लिली ही एक सुंदर आणि आकर्षक वनस्पती आहे. वॉटर लिलीमध्ये अनेक प्रकारचे रंग पाहायला मिळतात. जगभरात ही वनस्पती उगवली जाते आणि लोक आवडीने ही वनस्पती लावतात.

तलाव, कारंजे आणि बगीचा सजविण्यासाठी या वॉटर लिलीचा वापर केला जातो. घरातील जुने सामान जसे की, टब, बादली, पाण्याचा मग यामध्ये तुम्ही वॉटर लिली लावू शकता. प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये आजकाल अनेक जण वॉटर लिली लावतात. वॉटर लिली तुम्ही घरात इनडोअर प्लांट म्हणून लावू शकता किंवा बाहेर देखील लावू शकता.

वॉटर लिली ही वनस्पती पाण्याचे शुद्धीकरण करण्यास, ऑक्सिजन प्रदान करण्यास आणि माशांव्यतिरिक्त पाण्यातील इतर जलचरांना आधार देण्यास मदत करतात.

विशेष म्हणजे वॉटर लिलीची फुले, पाने आणि मुळे यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे, वॉटर लिलीचा वापर हा अनेक प्रकारच्या रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

अशा पद्धतीने लावा वॉटर लिली

सर्वात आधी तुम्हाला ज्या प्लॅस्टिकच्या टबमध्ये किंवा बादलीमध्ये वॉटर लिली लावायची आहे, तो टब किंवा बादली चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्या. टब किंवा बादली १८ ते २० इंच असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा एक टब घ्या. जे ८ ते १२ इंच असायला हवे.

आता प्लॅस्टिक टब किंवा मातीच्या वाडग्यामध्ये माती भरा आणि त्यात वॉटर लिलीचे रोप लावा.

water Lilies
water LiliesSakal

टब अशा ठिकाणी ठेवा जिथे पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल.

आता तुमच्या आधीच्या १८ ते २० इंचाच्या टबमध्ये ५० टक्के पाण्याची पातळी असेल, एवढ्या पाण्याने तो भरा.

पाण्याची लेव्हल मेंटेन करण्यासाठी त्यात वॉटर लिली बुडवा.

वॉटर लिलीची नियमित देखभाल करा आणि वनस्पतीची काळजी घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com