Yoga For Pollution: वायुप्रदूषणामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी ही योगासने करत राहा; श्वासासंबंधीच्या अनेक समस्या होतील दूर

योगासने आणि प्राणायाम केल्याने फुफ्फुसाची क्षमता वाढते
Yoga
Yoga sakal
Updated on

दिल्ली-एनसीआरमध्ये वाढते वायू प्रदूषण ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. विशेषत: दिवाळीच्या आसपास येथील हवा अधिक प्रदूषित होते. प्रदूषित हवेत श्वास घेणे कठीण होऊन लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

वाढत्या वायू प्रदुषणामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास सुरू झाले आहेत. त्यात दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटाक्यांमुळे वायू प्रदुषणात लक्षणीय वाढ होते.

वायू प्रदुषणामुळे अनेकांना घसा दुखणे, खोकल्याची समस्या, डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मात्र, आज आम्ही तुम्हाला योगाचे चार प्रकार सांगणार आहोत. जी नियमित केल्याने वायुप्रदुषणामुळे तुम्हाला होणाऱ्या त्रासापासून फायदा होण्यास मदत होईल. योगा केल्याने शरीरात साचलेल्या वाईट गोष्टी बाहेर पडू लागतात. योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून तुम्ही वायू प्रदूषणाचा त्रासा वाचवू शकता.

Yoga
Health Care News: हे 3 संकेत सांगतात तुमचा मधुमेह पोहोचलाय घातक पातळीवर! तज्ज्ञांनी दिली माहिती

अनुलोम-विलोम : वायुप्रदूषणापासून बचावासाठी नियमित योगासने करणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही अनुलोम विलोम केल्याने श्वसनाचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. रोज साधारण 5 ते 7 मिनिटे अनुलोम-विलोम केल्याने फुफ्फुसे मजबूत होतात. यामुळे नाडी शुद्ध होते.

अनुलोम विलोम करताना पहिल्यांदा उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यावा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडावा. त्यानंतर डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यावा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडावा. असे नियमित केल्याने श्वास घेण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

कपालभाटी : शरीराला वाढत्या वायुप्रदूषणापासून वाचवण्यासाठी रोज कपालभाटी केल्याने फायदा होऊ शकतो. कपालभाटी करण्यासाठी पालथी मांडी घालून सरळ रेषेत बसा. त्यानंतर पोटाचा खालचा भाग आत ओढा. यानंतर नाकातून वेगाने श्वास सोडा. तुम्हाला थकवा येईपर्यंत हे करत रहावे. असे केल्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्याशिवाय कपालभाटी केल्याने मन शांत होते. कपालभाटी केल्याने श्वासोश्वास संथ होऊन शरीर स्थिर होते. नियमित कपालभाटी केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

भस्त्रिका : भस्त्रिका प्राणायाम फुफ्फुस मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. असे केल्याने पोटाची चरबी कमी होते. यामुळे भूक वाढते. भस्त्रिका केल्याने श्वास घेण्यास होणारा त्रास दूर होतो. वायू प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही दररोज थोडा वेळ भस्त्रिका प्राणायाम केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

वाह्य : वाह्य प्राणायाम फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी आणि वायू प्रदूषणाचे परिणाम कमी करण्यासाठी फायदेशीर असा आहे. हे करण्यासाठी सर्वात प्रथम खाली बसून दीर्घ श्वास घ्यावा. त्यानंतर श्वास रोखून धरून तीनवेळा सोडावा.

श्वास बाहेर सोडताना पोट आणि डायाफ्रामचा वापर करावा. या क्रियेत श्वास सोडताना तुम्ही कोणत्याही अस्वस्थ स्थितीत असता कामा नये. याच्या नियमित सरावाने फुफ्फुसात शुद्ध हवा भरण्यास मदत होते. त्यामुळे वायू प्रदूषणाचा शरिरावर होणारे विपरीत परिणाम कमी होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.