Christmas Gift: तुम्हाला माहितीच असेल दरवर्षी 25 डिसेंबरला क्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण सीक्रेट सँता बनून त्यांच्या जवळच्या लोकांना गिफ्ट देतात. मात्र तुमच्या हृदयाच्या जवळच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट करायचं असेल तर स्वस्तात मस्त गिफ्ट ऑप्शन तुमच्यासाठी काय ठरेल ते आपण जाणून घेऊया.
जर तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडचा किंवा पार्टनरचा सँता बनून तिला काही स्पेशल गिफ्ट द्यायचे असले तुम्हाला खुप खर्च करायची गरज नाही. तुम्ही केवळ 100 रुपयांत तुमच्या गर्लफ्रेंडला खुश करू शकता. तसेच हे गिफ्टसुद्धा आकर्षक असणार आहे.
चॉकलेट - अनेक मुलींना चॉकलेट फार आवडतात. कपल्ससाठी वॅलेंटाइन डे मध्ये चॉकलेटसाठी एक वेगळा दिवस दिलाय. मात्र क्रिसमसला तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला एक चॉकलेट देऊन सरप्राइज करू शकता. हे चॉकलेट केवळ 100 रुपयांत मिळेल आणि तुमची गर्लफ्रेंडही खुश होईल.
गुलाबाचं फूल - जवळपास सगळेच तरूण त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचे फूल किंवा गुलदस्ता त्यांच्या गर्लफ्रेंडला देतात. तुम्हीही क्रिसमसला तुमच्या पार्टनरला गुलाबाचे फूल गिफ्ट करू शकता. हे फूल तुम्हाला शंभर रुपयांच्या आत मिळेल.
इयररिंग्ज - मुलींना वेगवेगळे स्टायलिश इयररिंग्ज घालायला आवडतात. प्रत्येक मुलीची ही आवडती वस्तू आहे. क्रिसमसमध्ये तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला शंभर रुपयांत चांगल्यात चांगले इयररिंग्ज गिफ्ट करू शकता. ती नक्कीच खुश होईल.
पेपर स्प्रे - प्रत्येक पार्टनरला त्यांच्या पार्टनरच्या सुरक्षेची चिंता असतेच. तुम्हाला तुमच्या पार्टनरला खुश करायचे असेल तर पेपर स्प्रे चा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. हा स्प्रे तुम्हाला शंभर रुपयांच्या आत ऑनलाइन किंवा ऑफलाइनही उपलब्ध असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.