बिबट्यापासून 'असा' करा बचाव

this way Protect from leopards: बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज जुळवून घेतो.
Lepord
LepordSakal
Updated on

this way Protect from leopards: बिबट्यांची संख्या व त्यांच्या हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता शहरातही बिबट्या अधून-मधून येत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये सिडको एन-१ परिसरात बिबट्या आला होता. सहा तासांनंतर वन विभागाने त्याला पकडले होते. आता शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या उल्कानगरीत दोन दिवसांपासून बिबट्या फिरत आहे. त्यामुळे नागरिकांची धाकधूक वाढली आहे.

कुठल्याही वातावरणाशी घेतो जुळवून

बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज जुळवून घेतो. शहर अथवा गावाजवळ अस्वच्छता असल्यास तेथे वावरणारी डुकरे, कुत्री यांच्या रूपाने खाद्य उपलब्ध होत असल्याने बिबट्याचा मानवी वस्त्यांजवळ वावर वाढला आहे. भक्ष्याचा पाठलाग करीत तो मानवी वस्तीत अथवा घरात शिरल्याची अनेक उदाहरणे आहेत. बिबट्या हा अत्यंत वेगवान प्राणी आहे. त्यामुळे मानवी वस्तीत घुसला, तर प्रचंड धुमाकूळ घालू शकतो.

अचानक बिबट्या समोर आल्यास काय करावे?

शांत राहा

घाबरू नका आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. पळाल्याने बिबट्याचे लक्ष वेधले जाऊ शकते.

डोळ्यांतून संपर्क

बिबट्याशी डोळ्याचा संपर्क साधा आणि त्याला हटविण्याचा प्रयत्न करा. त्याला पाठ दाखवू नका.

उभे राहा

स्वतःला मोठे दिसण्याचा प्रयत्न करा. हात वर उचला किंवा काही वस्तू हातात घेऊन स्वतःला बिबट्यापेक्षा उंच असल्याचे भासवा.

Lepord
Ashadhi Ekadshi Special Recipe: आषाढी एकादशी निमित्त बनवा चवदार साबुदाणा खीर, जाणून घ्या रेसिपी

आवाज करा

जोरात ओरडून किंवा शिट्टी वाजवून आवाज करा. मोठ्याने गाणे, संगीत लावा

हल्ला झाल्यास लढा

बिबट्याने हल्ला केल्यास तीक्ष्ण वस्तू, दगड, काठी किंवा इतर कोणत्याही उपलब्ध वस्तूने त्याला मारण्याचा प्रयत्न करा.

मानेला संभाळा

बिबट्या मानेला धरून शिकार करतो. अशावेळी आपल्या मानेभोवती जाड कपडा गुंडाळावा.

काय काळजी घ्यावी

वन विभागाला संपर्क

बिबट्याची चाहूल लागताच तत्काळ वन विभागाला संपर्क साधावा. तो कुठे जातोय यावर नजर ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com