Trending News : हौस म्हणून मानेवर काढला टॅटू; पण झालं असं काही की हौस अंगलट आली...

टॅटू काढताना योग्य ती खबरदारी घेणं फार आवश्यक आहे, नाहीतर मग हे असं होतं.
Tattoo
TattooSakal
Updated on

शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर टॅटू काढणं आता काही नवीन राहिलेलं नाही. काही जण पूर्ण अंगभर, हातभर टॅटू काढतात, तर काहीजण अगदी एखादा ठिपका किंवा छोटी नक्षी असलेला टॅटू काढतात. पण टॅटू काढणं काहीवेळा धोकादायकही ठरू शकतं. अशीच एक घटना समोर आली आहे.

एका महिलेला टॅटू काढणं चांगलंच महागात पडलं आहे. ही महिला एक टिकटॉक स्टार आहे. तिचं एलिअन जार्झ नावाने अकाऊंट आहे. तिने आपल्या मानेवर टॅटू काढला आहे. हा टॅटू लाल रंगाच्या एका सॅटिन रिबीनचा आहे. पण हा टॅटू काढल्याच्या काही तासांमध्येच तिला त्याचा त्रास होऊ लागला आहे.

Tattoo
Summer Jewellery Trends : आता तुमच्या समर ज्वेलरीचं कलेक्शन करा अपडेट

एलियनने आपल्या या टॅटूबद्दल व्हिडीओही केले आहेत. त्यामध्ये हा टॅटू अजिबात चांगला दिसत नाही, असं नाही, पण तो बनवतानाचा अनुभव खूप भयानक होता, असं तिने सांगितलं आहे. टॅटू काढण्यापूर्वी तिथली त्वचा स्वच्छ केली जाते, जेणेकरून तिथे कोणता विषाणू राहणार नाही. पण आपला टॅटू बनवण्यापूर्वी आर्टिस्टने त्वचा स्वच्छ केली नव्हती. तसंच त्या आर्टिस्टने अशा काही गोष्टी केल्या की ते पाहून टॅटू काढण्याची इच्छा नाही झाली. (Lifestyle News)

टॅटू बनवताना त्या आर्टिस्टने हिरवा साबण वापरला नाही. मला खूप विचित्र वाटलं कारण मी या आधीही टॅटू बनवले आहेत. त्या दुकानात मी एकटीच अशी होते की जिच्या अंगावर बरेचसे टॅटू आहेत. टॅटू बनवल्यानंतर त्या आर्टिस्टने हेही सांगितलं नाही, की त्याची काळजी कशी घ्यायची, असंही एलियनने सांगितलं.

Tattoo
Video Viral : फेसमास्क लावणं तरूणीला पडलं महागात; "ओ, नको, दादा, बाबा, आई...गणपती बाप्पा मोरया"

टॅटू स्टुडिओबद्दल थोडीशी माहिती मिळवल्यावर तिच्या लक्षात आलं की या स्टुडिओकड़े टॅटू बनवण्याचा परवाना नव्हता. तसंच त्या आर्टिस्टने याआधी कोणताही टॅटू बनवला नव्हता. पण याबद्दल त्या आर्टिस्टनेआधी काहीही सांगितलं नाही. यानंतर एलियनने दुसऱ्या एका आर्टिस्टकडून आपला टॅटू ठीक करून घेतला, आणि पुन्हा त्याचाही व्हिडीओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.