Self-Care while Living Alone: माणूस हा सामाजिक प्राणी आहे, असं म्हटलं जातं. त्याचमुळे वर्षानुवर्ष माणूस हा कुटुंबात किंवा घोळक्यात राहत आला आहे. मात्र बऱ्याचदा काही ना काही कारणामुळे अनेकांना एकटे रहावे लागते.
अनेक विद्यार्थी शिक्षणामुळे, तर काही कामामुळे, तर काहीना जवळचे कोणी नसल्यामुळे किंवा काहींना इतर काही कारणामुळे एकटे राहवे लागले किंवा काहीजण स्वत:च्या इच्छेने एकटे राहतात. त्यामुळे एकटे राहणाऱ्यांना स्वत:ची काळजीही स्वत:लाच घ्यावी लागते.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की एकटे रहाणे आणि एकाकी वाटणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकाकी वाटणे ही एक भावना आहे.
दरम्यान एकटे राहत असणाऱ्यांना आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी करता येतील, हे पाहू.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:ची सुरक्षा. आधी तुम्ही राहत आहात ते ठिकाण सुरक्षित आहे का, तिथे तुम्ही सुरक्षित राहू शकता का? या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ज्या ठिकाणी राहताय, त्या ठिकाणी जर सुरक्षितच वाटणार नसेल, तर त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम दिसू शकतो. त्यामुळे आधी तुमच्या सुरक्षेची खात्री करून घ्या.
बऱ्याचदा एकटे राहणारे लोक स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यातच एकटे राहत असल्याने त्यांची काळजी घेणारे कोणी जवळ नसतात, अशावेळी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे व्यायामाकडे, आहाराकडे लक्ष ठेवून स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे फायदेशीर ठरते.
त्याचबरोबर बऱ्याचदा अशा अनेक गोष्टी घडतात, ज्यामुळे आपला मूड खराब होतो, चिडचिड होते. अशावेळी स्वत:लाच सावरावे लागते.
त्यामुळे ज्यावेळी असे होईल, त्यावेळी गाणी ऐकणे, एखादा बाहेर फेरफटका मारणे किंवा आवडणाऱ्या गोष्टी करणे, अशा काही गोष्टी करून स्वत:ला सावरणे महत्त्वाचे असते. स्वत:लाच स्वत:ची काळजी घ्यावी लागते. तसेच स्वत:कडे लक्ष दिल्यास मानसिक तणावही दूर होण्यास मदत होऊ शकते.
एकटे राहणे बऱ्याचवेळा कंटाळवाणेही ठरू शकते. अशावेळी फिरायलाही तुम्ही जाऊ शकता. निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही फिरायला जाऊ शकता. किंवा एखाद्या गार्डनला जाऊ शकता. कधीतरी एखाद्या कॅफेत वेळ घालवू शकता. किंवा आवडणाऱ्या ठिकाणाला भेट देऊ शकता. यामुळे मनही ताजेतवाने होण्यास मदत होईल.
एकटे राहणाऱ्या लोकांना अनेकदा बराच वेळ रिकामा मिळून जातो, अशा वेळी एखादा छंद जोपासला जाऊ शकतो. किंवा एखादी नवीन गोष्ट ते शिकू शकतात.
उदाहर्णार्थ, जर एखाद्याला वेळ असेल, तर तो नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा डान्स आवडत असेल, तर ते करू शकतो किंवा एखाद्याला वाचायला आवडत असेल, तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचू शकता.
तुम्ही जिथे राहत आहात, ती जागा तुम्ही स्वत: तुम्हाला हवी तशी सजवा. तसेच नीटनेटकेपणा ठेवा. ज्यामुळे तुम्ही जेव्हाही ही जागा पाहल, तेव्हा तुम्हाला त्रास होणार नाही आणि आनंदी वाटत राहिल. गरज पडल्यास आणि तोच तोचपणे येत असेल, तर वस्तुंच्या जागा बदला किंवा नवीन, पण गरजेच्या वस्तू आणा. त्यामुळे घरात नाविण्यताही राहिल.
एकटे राहताय म्हणजे लोकांशी संपर्क तोडायचा असा अर्थ होत नाही. त्यामुळे जरी एकटे राहत असाल, तरी मित्र-मैत्रीणी, नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या संपर्कात रहा. त्यामुळे एकटे राहत असला, तरी एकाकीपणा येणार नाही आणि तुम्ही समाजाशी बांधलेले रहाल.
जर तुम्हाला प्राणी आवडत असतील, तर तुम्ही एखादा पाळीव प्राण्यालाही पाळण्याचा विचार करू शकता. यामुळे एकटेपणा दूर, तर होईलच, पण तुमचा मानसिक तणावही त्यांच्याबरोबर खेळल्याने, फिरल्याने दूर होऊ शकतो. फक्त तुम्ही त्या प्राण्याची पूर्ण काळजी घेऊ शकता ना, याचाही पूर्ण विचार करून निर्णय घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.