अनेक जणांची एकच तक्रार असते ती म्हणजे सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर सूज येणे. आपल्या डोळ्यांजवळील त्वचा अत्यंत सेंसिटिव्ह असते. त्यामुळे डोळ्यांजवळ तैलीय पदार्थ जमा झाल्यामुळे किंवा पेरिऑर्बिटल एडिमामुळे डोळ्यांभोवती सूज येऊ शकते. इतकंच नाही तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळेदेखील ही सूज येऊ शकते. म्हणूनच, डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत ते पाहुयात. (tips for puffy eyes home remedies to overcome swelling from eyes)
१. डोळ्यांखाली सूज आली असेल तर बर्फाच्या पाण्याने चेहरा धुवावा.
२. जर बर्फाच्या पाण्याने तोंड धुणं शक्य नसेल तर बर्फाचे काही तुकडे रुमालात बांधून त्याने डोळ्यांभोवती शेक द्यावा.
३. काकडीच्या गोल चकत्या करुन त्या काही वेळ फ्रिजमध्ये ठेवाव्यात. त्यानंतर या चकत्या१५ मिनिटे डोळ्यांवर ठेवाव्यात.
४. टी बॅग्स पाण्यात भिजवून त्या फ्रिजमध्ये गार करा व त्यानंतर डोळ्यांवर ठेवा.
५. मेटलचा चमचा गार करा व हलक्या हाताने त्याचा डोळ्यांना शेक द्या.
६. डोळ्यांवरील सूज कमी करण्यासाठी दररोज ५-६ लीटर पाण्याचं सेवन करा.
७. झोपण्यापूर्वी साधारणपणे १ तास मोबाईल, टिव्ही यांच्यापासून दूर रहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.