Wedding Venue :लग्नाचा 'व्हेन्यू' ठरविताना या गोष्टींची घ्या काळजी

पैशाचा पाऊस पाडून थाटामाटात लग्न करायला अनेकांना आवडत असले, तरी सध्या मिनिमल स्टाइलने लग्न करण्याचासुद्धा ट्रेंड आहे.
Wedding Venue
Wedding Venueesakal
Updated on

भाग्येश रानडे

हल्ली आपल्याकडची बरीच तरुण मुले-मुली शिक्षण आणि नंतर नोकरीमुळे परदेशातच स्थायिक होतात. पण लग्न मात्र त्यांना येथे करायचे असते, आणि आपल्या परदेशी मित्रमंडळींना इथल्या संस्कृतीची ओळख करून देण्याची फार इच्छा असते.

आणि म्हणूनच अगदी मेंदी, संगीतपासून ते लग्न होईपर्यंत आपली संस्कृती व्हेन्यू डेकोरेशनमध्ये दिसावी असा त्यांचा आग्रह असतो.

डिसेंबर आला की नववर्षासोबतच वेध लागतात ते लगीनघाईचे. साधारण तुळशीच्या लग्नानंतर सगळीकडे लग्नांची लगबग चालू होते.

विविध कार्यालये, मोठमोठे लॉन या दिवसांमध्ये सनई-चौघड्यांपासून दिव्यांच्या रोषणाईपर्यंत अगदी थाटात सजलेले दिसतात.

एखादे लग्न किंवा त्या लग्नापूर्वीचे आणि नंतरचे कार्यक्रम, म्हणजेच मेंदी, संगीत आणि लग्नानंतर रिसेप्शन यांचा थाटबाट आपण कायमच पाहत असतो. परंतु हे सर्व कार्यक्रम नीट पार पाडण्यासाठी महत्त्वाचा असतो तो व्हेन्यू!

व्हेन्यू समारंभाला साजेसा, आपल्या गरजेनुसार निवडायला हवा. त्या ठिकाणी कोणत्या सोयीसुविधा मिळणार आहेत, याची नीट चौकशी करून व्हेन्यू ठरवायला हवा.

पण त्याआधी व्हेन्यू निवडताना सगळ्यात पहिल्यांदा करायची गोष्ट म्हणजे आपले बजेट ठरवणे. बजेटचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे मग व्हेन्यू निवडायला हवा, असे मी आवर्जून सांगेन.

एकदा का आपापल्या बजेटनुसार व्हेन्यू ठरला की त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्या-त्या कार्यक्रमाला साजेसे सुंदर डेकोरेशन आणि कलर पॅलेट यांचे विविध पर्याय पाहणे!

कधी बॉलिवूड कलाकारांच्या लग्नांप्रमाणे, तर कधी सोशल मीडिया पेजवर पाहिल्याप्रमाणे; कुठे फिकी तर कुठे गडद रंगछटा... कुठे खऱ्या तर कुठे आर्टिफिशियल फुलांचे डेकोरेशन; एवढेच काय हल्लीच्या ट्रेंडप्रमाणे नवीन जोडप्याचा हॅशटॅग असणारे फोटोबूथ... अशा अनेक गोष्टींचे पर्याय नवीन जोडपी आम्हाला विचारत असतात.

अशा सर्व विवाहेच्छुकांच्या मागण्या त्यांच्या बजेटमध्ये पुरवणे ही खरेतर अक्षरशः तारेवरची कसरतच असते. पण इव्हेंट प्लॅनिंग करताना आम्ही ग्राहकांच्या इच्छा, अपेक्षा आधी समजून घेतो.

एखाद्याची अपेक्षा बंदिस्त एसी हॉल असावा अशी असल्यास, त्यांना त्याप्रमाणे हॉलमध्ये कोणत्या व्यवस्था आहेत याची माहिती दिली जाते.

तसेच कोणाला छान मोकळ्या हवेत, निसर्गरम्य परिसरात लॉनमध्ये लग्नाच्या आधीचे आणि नंतरचे कार्यक्रम करायचे असल्यास त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात याचीदेखील माहिती पुरवली जाते.

ऐन कार्यक्रमाच्या दिवशी कोणत्याही छोट्या गोष्टीवरून ग्राहकाचा हिरमोड होणार नाही यासाठी अगदी व्हेन्यू बुकिंगसाठी चौकशी करायला आल्यावरच आम्ही या सगळ्या सोयीसुविधांची माहिती देत असतो.

Wedding Venue
Wedding Season : डिजिटल लग्नपत्रिकाची वाढली क्रेझ; नातेसंबंध मात्र दुरावले

पण तरीही कधीकधी वीज जाणे, काही टेक्निकल प्रॉब्लेम येणे, तर कधी मार्केटमधील परिस्थितीमुळे ठरलेल्या फुलांच्या डेकोरेशनमध्ये अचानक थोडा बदल करावा लागणे, कधी कार्यक्रम चालू असताना बैठक व्यवस्था वाढवायला लागणे, तर कधी ठरवून दिलेल्या गोष्टी सोडून आहे त्या बजेटमध्येच ऐनवेळी जास्तीच्या गोष्टी उपलब्ध करून देणे, ओपन लॉनवर समारंभ असताना अचानक पाऊस आल्यास संपूर्ण समारंभाची पर्यायी उत्तम व्यवस्था करणे यांसारख्या अडचणी कधी समारंभाच्या पूर्वतयारीच्यावेळी, तर कधी चक्क समारंभ चालू असताना निर्माण होऊ शकतात.

अशा वेळी सोहळ्यामध्ये कोणाचाच हिरमोड होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो; ते आमचे कर्तव्यच आहे असे आम्ही मानतो.

व्हेन्यू डेकोरेशनच्या सध्याच्या ट्रेंडबद्दल बोलायचे झाले, तर पेस्टल कलर थीमला जबरदस्त मागणी आहे.

पूर्वीच्या हिरवा, लाल, पिवळा अशा गडद रंगांच्या जागी आता गुलाबी, पीच, आकाशी, तर कधी पांढरा यांसारख्या ब्रिटिश रंगांची सजावट आजकालच्या तरुणाईला अपेक्षित असते.

तसेच हल्ली लग्नसोहळ्यांमध्ये टिपिकल डीजेऐवजी सायलंट डीजे नाइट, कॉकटेल पार्टीमध्ये फायर शॉट्स अशा अनेक आधुनिक गोष्टी पाहायला मिळतात. मेंदी-संगीतप्रमाणेच हळद खेळणे हासुद्धा तेवढाच मोठा इव्हेंट असतो.

नवरा-नवरीची ‘हटके’ एंट्री, यांसारख्या अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींचेसुद्धा तरुण पिढीला आकर्षण आहे. खरेतर सध्या आजूबाजूला पहिले, तर बरीच तरुण मुले-मुली शिक्षण आणि नंतर नोकरीमुळे परदेशातच स्थायिक होतात.

पण लग्न मात्र त्यांना येथे करायचे असते, आणि आपल्या परदेशी मित्रमंडळींना इथल्या संस्कृतीची ओळख करून देण्याची त्यांना इच्छा असते. आणि म्हणूनच अगदी मेंदी, संगीतपासून ते लग्न होईपर्यंत आपली संस्कृती व्हेन्यू डेकोरेशनमध्ये दिसावी असा त्यांचा आग्रह असतो.

पूर्वी लग्न म्हटले की वधू-वर, त्यांचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचाच समावेश असायचा. पण हल्ली लग्नांमध्ये सेलिब्रिटी टच देण्यावर फार भर आहे आणि त्यासाठी कितीही पैसे मोजायची तयारी असते.

कधीकधी तर व्हेन्यूवाल्यांचे कॉन्टॅक्ट वापरूनसुद्धा कोणी एखादा प्रसिद्ध एन्फ्लुएन्सर, रील स्टार लग्नाला फक्त हजेरी लावायला बोलावता येईल का, अशीसुद्धा विचारणा व्हेन्यू बुकिंग करताना केली जाते.

तर कधी लग्नाला सत्तरचजण आहेत, पण व्हेन्यू मात्र ८०० लोकांचा चालेल; कारण काय, तर मोठ्या जागेत रील जास्त छान करता येतील, असे जेव्हा कोणी ग्राहक आम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही छोटा व्हेन्यू घ्या, तुमचे पैसे वाचतील, असे आम्हीच त्यांना सुचवतो.

Wedding Venue
Moye Moye Trend: हे 'मोये मोये' आहे तरी काय? का होतंय जगभरात ट्रेंड

पैशाचा पाऊस पाडून थाटामाटात लग्न करायला अनेकांना आवडत असले, तरी सध्या मिनिमल स्टाइलने लग्न करण्याचासुद्धा ट्रेंड आहे. म्हणजेच अतिशय साध्या पद्धतीने केलेले लग्न. अगदी हातावरच्या मेंदीपासून येणाऱ्या पाहुण्यांपर्यंत सगळेच अगदी मोजूनमापून करण्यावरसुद्धा हल्ली भर दिला जातो.

कधीकधी असे छोटेखानी पद्धतीने होणारे लग्नसोहळे इतके शांतपणे साजरे होतात, की लग्न होत असलेल्या व्हेन्यूच्या बाहेरून जाणाऱ्याला येथे लग्न सुरू आहे असे सांगितले तर खरे वाटणार नाही. फारसा गाजावाजा न होता, सारे कसे शांतपणे पार पडते.

लग्नाच्या मेंदी, संगीत, कॉकटेलपासून अगदी मुख्य लग्न आणि मग स्वागत समारंभापर्यंत सर्व कार्यक्रमांचा डोलारा लीलया पेलणारे पडद्यामागचे हात म्हणजे त्या व्हेन्यूचे व्यवस्थापक!

ऐन कार्यक्रमात अमुकच हवे असे हट्ट धरणारे नवरा-नवरी असोत किंवा तमुक गोष्ट स्टेजवर अजिबातच चांगली दिसत नाही, लगेच काढून टाका अशी मागणी करणारे वधू-वरांचे कोणी नातेवाईक असोत;

या सगळ्यांच्या विविध मागण्या न थकता पुरवत प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करायचा या भावनेने व्हेन्यूचे व्यवस्थापक आणि त्यांची डेकोरेशन, लाइट, स्वच्छता, पार्किंग या सर्व बाजू सांभाळणारे साथीदारांची टीम अखंड काम करत राहते.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची घटना असते. ती कोणत्या पद्धतीने साजरी करायची हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न असला, तरी एखाद्या सेलिब्रिटीने अमुक एक केले म्हणून मलापण तसेच हवे किंवा माझ्या लग्नात मला तमुक गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच यांसारखे हट्ट न करता आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे पुष्कळ पैसा जरी असला, तरी लग्नसोहळ्यावर तो किती आणि कसा खर्च करायचा याचा ताळमेळ ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते हे लक्षात घ्यावे, असे मला वाटते.

--------------------

Wedding Venue
Marriage : शुभमंगलसाठी इच्छुक झाले ‘सावधान’...! संपूर्ण मोसमात ८७ मुहूर्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.