मुलांना मोबाईलचं व्यसन तर नाही ना?

मुलं हट्ट करायला लागल्यावर तुम्ही पण त्यांना मोबाईल देता का?
मुलांना मोबाईलचं व्यसन तर नाही ना?
Updated on

लहान मुलं (child) हट्ट करु लागले, त्रास द्यायला लागले की अनेक स्त्रिया त्यांच्या हातात मोबाईल देतात आणि त्यांना शांत बसवतात. तुम्ही सुद्धा असं काही करता का? करत असाल तर ही सवय वेळीच मोडा. कारण, त्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिकतेवर होऊ शकतो. आज अनेक लहान मुलं तासंतास मोबाईल (Mobile), लॅपटॉप (Laptop), टॅब (Tab) वापरताना दिसतात. विशेष म्हणजे लहान मुलांनी हट्ट केला की आई-वडीलदेखील हे गॅझेट्स मुलांना देतात. मात्र, ही गॅझेट्स सतत वापरल्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, निद्रानाश या समस्या निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच लहान मुलांची ही सवय सोडवण्यासाठी पालकांनी नेमकं काय करावं ते पाहुयात. (tips-to-keep-child-away-from-phone)

१. लहान मुलं कायम आपल्या आई-वडिलांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे मुळात तुम्हालाच सतत मोबाईल, लॅपटॉप वापरण्याची सवय कमी करावी लागेल. ऑफिसच्या वेळात फोन किंवा लॅपटॉप वापरणं गरजेचं आहे. मात्र, कामाव्यतिरिक्त जर तुम्ही सतत या गोष्टी वापरत असाल तर त्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो. एकतर मुलांनादेखील मोबाईल वगैरे वापरायची सवय लागेल. आणि, दुसरी गोष्टी तुम्ही मुलांना वेळ देत नसल्यामुळे ती एकलकोंडी होतील. त्यामुळे तुमचा व त्यांचा संवाद तुटेल किंवा मुलं चिडचिडेपणा करतील.

मुलांना मोबाईलचं व्यसन तर नाही ना?
'या' चार गोष्टींमुळे महिलांच्या करिअरमध्ये निर्माण होते अडचण

२. लहान मुलांना कंटाळा येत असेल तर त्यांना घरातील लहान मोठ्या कामांमध्ये गुंतवून ठेवा. उदा. झाडांना पाणी घालणे, कपड्यांच्या घड्या घालणे, टेबल पुसणे. अशी लहान लहान कामं सांगितली. तर त्यांचं मन रमेल, तसंच एखादं काम करताना चूक झाली तर ती कशी सावरायची हेदेखील त्यांना कळेल. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.

३. मुलांमधील प्रत्येक कलागुणांना वाव देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मुलांमधील टॅलेंट ओळखा व त्यात त्यांना डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. पेंटिंग, डान्स, म्युझिक किंवा अन्य कोणत्या गोष्टी मुलांना आवडतात ते त्यांच्याकडून जाणून घ्या. व त्यांना कंटाळा आला तर त्यांना याच कलांमध्ये गुंतवून ठेवा.

४. अनेक लहान मुलं सकाळी उठल्यावर प्रथम टिव्ही किंवा मोबाईल समोर बसतात. पण, त्याऐवजी मुलांना सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याची सवय लावा. मैदानी खेळ खेळायला पाठवा. मुलांचं हे वय घरात बसण्याचं नसून मैदानात खेळण्याचं आहे. यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळते.

मुलांना मोबाईलचं व्यसन तर नाही ना?
ऑफिसमध्ये चुकूनही अशा पद्धतीने नका वागू

५. मुलांची मोबाईल किंवा टॅबची सवय सुटत नसेल तर त्यांना मारु नका. प्रेमाने समजवा. मुळात त्यांना ही सवय लावण्यामागे तुम्हीच कारणीभूत आहात. त्यामुळे आता मुलांना मारुन किंवा ओरडून नात्यात दरी निर्माण करु नका. त्यांच्या कलाकलाने, प्रेमाने समजवा. जर मारत असाल तर मुलांना चोरून चोरुन वस्तू वापरण्याची सवय लागू शकते.

६. अनेक स्त्रिया मुलं जेवत नसतील किंवा ऐकत नसतील तर त्यांना मोबाईलचं आमिष दाखवतात. अमूक काम केलं तर मोबाईल देईन असं सांगतात. पण हे अत्यंत चुकीचं आहे. मुलांमध्ये त्यामुळे नकारात्मकता निर्माण होते व कोणतंही काम करण्यापूर्वी ते प्रथम बदल्यात काय देणार असा प्रश्न उपस्थित करु लागतात.

दरम्यान, लहान मुले सतत गॅझेट्सचा वापर करत असल्यामुळे त्यांच्यात मानदुखी,डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ होणे किंवा ते लाल होणे या समस्या निर्माण होत आहेत.तसंच काही तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या या सवयीमुळे पुढे जाऊन ते अनसोशल (Unsocial) किंवा अँटी सोशल (Anti Social) होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.