Tips To Reduce Cholesterol : कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा जगात भारी फंडा, हे पदार्थ खा Bad Cholesterol वितळवा

कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो
Tips To Reduce Cholesterol
Tips To Reduce Cholesterolesakal
Updated on

Tips To Reduce Cholesterol : कोलेस्ट्रॉल एक वेगाने वाढणारी गंभीर समस्या आहे. कोलेस्टेरॉल रक्तात आढळणारा एक पदार्थ आहे जो चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा असतो. शरीराने उत्तम काम करावे म्हणून गुड कोलेस्टेरॉलची खूप जास्त गरज असते तर बॅड कोलेस्टेरॉल मात्र शरीराचा शत्रू असतो. यामुळे हृदयाचे गंभीर आजार, हृद्यविकाराचा झटका आणि हार्ट स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

खराब कोलेस्ट्रॉलचे कार्य नसांना चिकटून राहणे आहे. ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या एलडीएल कोलेस्ट्रॉल रक्तापर्यंत पोहोचू देत नाहीत आणि ते शरीरातून काढून टाकण्यास मदत करतात. 2019 मध्ये, पब्मेड सेंट्रलवर एक अभ्यास प्रकाशित झाला होता.(Cholesterol)

ज्यामध्ये कोलेस्टेरॉलचे शोषण रोखण्यासाठी विद्रव्य फायबरची नोंद केली गेली होती. हे तंतू कोलेस्टेरॉलला बांधून आतड्यांतून बाहेर काढतात. चला तर मग जाणून घेऊया अशाच 5 पदार्थांबद्दल, ज्यामध्ये विद्रव्य फायबर असते.

Tips To Reduce Cholesterol
Agewise Cholesterol levels: वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?

वाढत्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं काय आहेत

गंभीर गोष्ट हीच आहे की शरीरात कोलेस्टेरॉलचे कोणतेच स्पष्ट लक्षण दिसत नाहीत त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढले आहे का आणि किती वाढले आहे हे आपण लगेच ओळखू शकत नाही. वास्तवात कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्त वाहिन्या म्हणजेच रक्ताच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होती आणी त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह हा स्लो होतो.

Tips To Reduce Cholesterol
High Cholesterol : थंडीच्या दिवसांत आहारात या फळांचा समावेश करा, नसांत जमा कोलेस्ट्रॉल सहज वितळेल

हे पदार्थ खा, कोलेस्ट्रॉल वितळवा

ओट्स

वजन कमी करण्यासाठीचा पौष्टीक पदार्थ म्हणून ओट्सकडे पाहिले जाते. या पदार्थाचे नाव तुम्ही खूप कमी ऐकले असेल, पण ही एक अद्भुत गोष्ट आहे. यात विद्रव्य फायबरजास्त प्रमाणात असते, जे पचन दरम्यान कमी घनतेचे लिपोप्रोटीन बाहेर आणते.

हिरवा वटाणा

सिझन शिवायही आता वटाणे मिळू लागले आहेत. त्यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉलला हरवण्यासाठी हिरवा वटाणा खाऊ शकता. हिरव्या वाटाण्याचे दाणे खाताना ते हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करू शकतात. असा विचारही केला नसेल. कारण त्यामध्ये विद्रव्य फायबर देखील असते, जे हृदयरोगास कारणीभूत असलेल्या चिकट पदार्थाला शरीरात जिवंत राहू देत नाही.

सफरचंद

सफरचंद खाल्ल्याने केवळ कोलेस्ट्रॉलच दूर राहत नाही. तर, स्ट्रोकसारखी जीवघेणी स्थितीही दूर राहते. यात विरघळणारे फायबर देखील असते, जे आतड्यांमधील एलडीएलशी चिकटते आणि मलद्वारे उत्सर्जित करण्यास मदत करते.

राजमा

हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी शेंगदाण्यांचे सेवन करा. यूएसडीएच्या मते, 100 ग्रॅम राजमा 24.9 ग्रॅम फायबर प्रदान करते. हा देखील एक प्रकारची शेंग आहे. जी प्रथिने, कार्बचा मोठा सोर्स आहे.

लिंबूवर्गीय फळे

कोलेस्टेरॉल दूर करण्यासाठी लिंबूवर्गीय फळे खा. त्यामध्ये विद्रव्य फायबरसह व्हिटॅमिन सी देखील असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हे आपल्याला इतर आजारांपासून वाचविण्यास देखील मदत करते.

Tips To Reduce Cholesterol
How to Control Cholestrol : कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायचंय? हे वाचाच

हे पदार्थ कमी प्रमाणात खा

रेड मीट - रेड मीटमध्ये कोलेस्टेरॉल आणि सेच्युरेटेड फॅटची मात्रा अधिक असते. त्यामुळे ते खाऊ नका

तळलेले पदार्थ – सामोसा, वडापाव, पुरी असे तळलेले पदार्थ कोलेस्ट्रॉल वाढवतात

फास्टफूड – जसं याच्या नावात फास्ट आहे तसंच हे शरीरातील कोलेस्ट्रॉलही वाढवतात

चीज – शरीरातील  कोलेस्ट्रॉल वाढवण्यास चीज कारणीभूत ठरतं

Tips To Reduce Cholesterol
Garlic Benefits : लसूण खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.