Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Tirumala Tirupati Laddu: भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय तिरुपती बालाजी मंदिर आणि तिथल्या लाडूच्या प्रसादात भेसळ असल्याने हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. तुम्हाला तुपाची शुद्धता तपासायची असेल तर घरी कोणत्या पद्धतीचा वापर करू शकता हे जाणून घेऊया.
Tirumala Tirupati Laddu:
Tirumala Tirupati Laddu:Sakal
Updated on

Tirumala Tirupati Laddu: भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदिरांमध्ये तिरुपती बालाजी मंदिर एक आहे. याला सर्वात श्रीमंत मंदिर बोलले जाते, कारण येथे मोठ्या प्रमाणात दान येते. सध्या तिरूपती मंदिरात प्रसाद म्हणून दिला जाणारा लाडू चर्चेचा विषय ठरला आहे. कारण यामध्ये बनावट तूप आणि प्राण्यांची चरबी मिसळली असल्याच्या वृत्तामुळे हा वाद आणखी चिघळत चालला आहे.

चंद्राबाबू नायडू सरकारने गुरुवारी एक अहवालही जारी केला ज्यामध्ये असा दावा करण्यात आला की तिरुपती मंदिरात भक्तांना वाटण्यासाठी तयार केलेल्या लाडूमध्ये 3 भिन्न पदार्थ देखील आढळले आहेत.

अहवालानुसार हे लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तूप भेसळयुक्त असून त्यात विदेशी फॅट टाकण्यात आले आहे. या भेसळयुक्त तुपात म्हशीची चरबी, माशाचे तेल यांसारखी भेसळ असल्याचे सांगितले जाते.

Tirumala Tirupati Laddu:
Tirupati Laddu Recipe: घरीच बनवा खास तिरूपती लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

परदेशी चरबी म्हणजे काय?

विदेशी चरबी हा एक प्रकारचा कृत्रिम चरबी आहे. जो दुग्धजन्य पदार्थांमध्ये मिसळा जातो. तूप, लोणी यांसारख्या गोष्टींमध्ये भेसळ करणारे विदेशी चरबी टाकतात. जेणेकरून कमी खर्चात जास्त प्रमाणात तूप तयार करता येईल आणि हे तूप बाजारात विकून अधिक फायदा मिळवता येईल.

तुपात प्राण्यांची चरबी आढळली

प्रसादात काही प्रमाणात गोमांस सुद्धा आढळून आले. बीफ टॅलो हे शेळी, म्हैस, मेंढी या प्राण्यांच्या चरबीपासून बनवले जाते. ही चरबी साधारणपणे पांढरी असते आणि तूप, लोणी किंवा तेल यांसारख्या गोष्टींमध्ये सहज मिसळता येते. परदेशात हे ब्रेडवर लावून खाल्ले जाते.

माशांपासून काढलेली चरबी असलेल्या बनावट तूपात लार्ड फॅट किंवा पिग फॅट आणि फिश ऑइल देखील आढळून आले. फिश ऑइलचा वापर काही औषधांमध्ये केला जातो. पण, हे शाकाहारी पदार्थ नसल्याने प्रसादासारख्या गोष्टींमध्ये त्याचा वापर केला जात नाही.

Tirumala Tirupati Laddu:
Tirupati Laddu History: तिरूपतीमध्ये लाडवाची प्रथा कधीपासून सुरू झाली ? जाणून घ्या 300 वर्षापूर्वीचा इतिहास

शुद्ध तूपाची तपासणी कशी करावी?

तुम्ही बाजारातून विकत आणलेले तूप शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता.

तूपाचा सुंगध ओळखा

तूप खरेदी करताना त्याचा वास घ्यावा. घट्ट सोनेरी रंगाचे तूप शुद्ध आणि सुगंधी असते.

पेपर चाचणी

पांढऱ्या कागदावर थोडे तूप पसरवा. काही वेळाने हा पेपर तपासा. बनावट तुपामुळे कागदावर काळे डाग पडतात. तर शुद्ध तुपात असे डाग पडत नाही.

तूप घट्ट करण्याची प्रक्रिया

शुद्ध तूप फ्रिजरच्या बाहेर असल्यास ते घट्ट होत नाही. तर फ्रिजमध्ये ठेवल्यावर तूप घट्ट होते. जर तूप सामान्य तपमानावर घट्ट झाले तर याचा अर्थ त्यात काही प्रकारची भेसळ केली गेली आहे.

इतर पर्याय

एक चमचा तूप घेऊन ते एका काचेच्या ग्लासमध्ये ओतावे. नंतर त्यात आयोडीनचे एक किंवा दोन थेंब टाका. तूपात भेसळ असल्यास रंग लगेच बदलतो. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Related Stories

No stories found.