Tirumala Tirupati: तिरूमला तिरुपतीला गेल्यावर केस दान करण्याची प्रथा कशी सुरू झाली? वाचा काय आहे कथा

why people donate hair Tirumala Tirupati : बालाजीला जेवढे केस दान केले त्याच्या १० पटीने परत देतात अशी श्रद्धा आहे. पण या परंपरेमागे एक कथा आहे.
Tirumala Tirupati Donate Hair Culture
Tirumala Tirupati Donate Hair CultureSakal
Updated on

why people donate hair Tirumala Tirupati : जगभरात आंध्र-प्रदेशतील तिरूपती बालाजी मंदिर प्रसिद्ध आणि लोकप्रिय देवस्थान आहे. येथे देश-विदेशातील अनेक लोक दर्शनासाठी येतात. तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्र-प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात वसलेले आहे. या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते, कारण येथे दररोज लाखो-कोटींचे दान केले जाते. 

Tirumala Tirupati:
Tirumala Tirupati:Sakal

तिरूपती बालाजीला केस दान करण्याची परंपरा खुप जूनी आहे. फक्त पुरूष नाहीच तर महिला देखील केस दान करतात. मान्यतेनुसार येथे केस दान केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते. लाखो भाविक इच्छा घेऊन बालाजीला येतात आणि केस दान करतात. बालाजीला जेवढे केस दान केले त्याच्या १० पटीने परत देतात अशी श्रद्धा आहे. पण या परंपरेमागे एक कथा आहे.

Tirumala Tirupati Donate Hair Culture
Tirupati Laddu History: तिरूपतीमध्ये लाडवाची प्रथा कधीपासून सुरू झाली ? जाणून घ्या 300 वर्षापूर्वीचा इतिहास
Hair Donate
Hair Donate

कथेनुसार बालाजीजवळ मुंग्याचा पर्व बनला होता. तिथे एक गाय येत असे आणि दूध देत होती. पण एक दिवस गाईच्या मालकाने पाहिले आणि क्रोधीत होऊन गाईला मारले. पण बालाजीला दुखापत झाली आणि त्यावेळी काही केस तुटले. यामुळे माता नीलाने आपले केस कापले आणि बालाजीला अर्पण केले. यामुळे नारायण प्रसन्न झाले आणि म्हणाले जे व्यक्ती केसांचा त्याग करून अर्पण करतील त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असे वरदान तिरूपती बालाजीला दिले.

Tirumala Tirupati Donate Hair Culture
Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

अनेक लोक केलेल्या चुकीचे प्रायाश्चित करण्यासाठी बालाजीला केस अर्पण करतात आणि सकारात्मक मार्गावर चालतात. अशा व्यक्तीवर माता लक्ष्मीची कायम कृपादृष्टी राहते.तिरूपती बालाजीला लाखो लोक केस अर्पण करतात असे सांगितले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.