Tirupati Laddu: तिरुपती लाडूत वापरला जातो कापूर, जाणून घ्या काय आहेत आरोग्यदायी फायदे

Tirupati Laddu Row: भीमसेनी कापूर हा खाण्यायोग्य असून आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण त्याचा आहारात कसा समावेश करावा हे जाणून घेऊया.
camphor used in balaji laddu
camphor used in balaji ladduSakal
Updated on

Camphor Used in Tirupati Laddu: भारतात पूजा-हवन आणि इतर अनेक पवित्र आणि धार्मिक कार्यात कापूरचा वापर केला जातो. कापूर अनेक प्रकारच्या समस्यांवर आयुर्वेदिक औषध म्हणूनही वापरला जातो. कापूरचे दोन प्रकार आहेत, एक खाण्यायोग्य कापूर आणि दुसरा सिंथेटिक कापूर.

सिंथेटिक कापूर पूजा, हवन इत्यादींमध्ये वापरला जातो. पण आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांमध्ये खाण्यायोग्य कापूरचा वापर केला जातो. खाण्यायोग्य कापूरला भीमसेनी कापूर असेही म्हणतात.

कापूरच्या झाडाच्या लाकडापासून किंवा सालापासून भीमसेनी कापूर तयार केला जातो. दक्षिण भारतात आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कापूरचा वापर अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

कापूर सेवन करणे आरोग्यदायी मानले जाते. कापूर अनेक आरोग्यासंबंधित समस्या दूर ठेवते. अशी माहिती डायटीशियन डॉ वी डी त्रिपाठी यांनी द हेल्थ साइने वृत्ताला दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया कापूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत.

कापूरचे आरोग्यदायी फायदे

सर्व घरांमध्ये कापूर वापरला जातो. हा कापूर कृत्रिम असून पूजा, हवनमध्ये वापरला जातो. पण खाण्यायोग्य कापूर किंवा नैसर्गिक कापूरचे सेवन अनेक प्रकाे केले जाते. केस किंवा त्वचेसंबंधित समस्या असल्यास याचा वापर केला जातो. भीमसेनी कापूरचा वापर करून वजन, नियंत्रणात ठेवणे, पचन सुलभ होणे यासारखे फायदे होतात. कापूरचे पुढील प्रमाणे फायदे जाणून घेऊया.

वजन कमी

खाण्यायोग्य कापूरचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते. सध्या धावपळीच्या जीवनात अनेकांना लठ्ठपणा या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही खाण्यायोग्य कापूर वापरू शकता. खाण्यायोग्य कापूर खाल्ल्याने तुमची पचनक्रिया मजबूत होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते.

रक्ताभिसरण सुरळित राहते

शरीरातील रक्ताभिसरण सुरळित ठेवायचे असेल तर कापूचा वापर करू शकता. अनेक संशोधनात समोर आले की खाण्यायोग्य कापूर शरीरातील रक्ताभिसरण सुरळित ठेवते.

मज्जासंस्थेशी संबंधित समस्या

मज्जासंस्थेशी संबंधित समस्या कापूर दूर ठेऊ शकतो. पण याचे अत्यंत मर्यादित आणि नियंत्रित पद्धतीने सेवन केले पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन केल्यानंतर या समस्यांसाठी खाण्यायोग्य कापूर वापरू शकता.

camphor used in balaji laddu
Tirupati Laddu History: तिरूपतीमध्ये लाडवाची प्रथा कधीपासून सुरू झाली ? जाणून घ्या 300 वर्षापूर्वीचा इतिहास

पचन सुलभ होते

खाण्यायोग्य कापूर यांचे सेवन पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथातही याचे तपशीलवार वर्णन केले आहे. खाण्यायोग्य कापूरमध्ये भूक वाढवणारे आणि पचनसंस्था सुधारणारे गुण असतात.

मळमळ कमी होते

नैसर्गिक कापूर खाल्याने मळमळ कमी होते. तुम्हाला मळमळ किंवा उलटी होत असेल तर याचे सेवन करू शकता. यासाठी खाण्यायोग्य कापूर थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळून सेवन केल्याने ही समस्या कमी होऊ शकते.

सर्दी आणि खोकला कमी होतो

खाण्यायोग्य कापूरचे सेवन केल्यास सर्दी आणि खोकल्याची समस्या कमी होते. तसेच याचे सेवन केल्याने फुफ्फुसातून श्लेष्मा बाहेर पडतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. कफ पाडणारे गुणधर्म खाण्यायोग्य कापूरमध्ये आढळतात. तीव्र सर्दी-खोकला झाल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कापूर घेतल्याने खोकला आणि सर्दीची समस्या दूर होते.

camphor used in balaji laddu
Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

पुढील गोष्टी ठेवा लक्षात

दभिण भारतात प्रसिद्ध सण पोंगलमध्ये त्याचा वापर करून अनेक पदार्थ तयार केले जातात. तसेच तुम्ही लाडूमध्ये टाकून सेवन करू शकता. तसेच अनेक आरोग्यासंबंधित समस्यावर कापूर वापरला जातो. पण याचा वापर करताना प्रमाण आणि डोस लक्षात ठेवावे. अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वयंपाकासाठी फक्त भीमसेनी किंवा नैसर्गिक कापूर वापरला जातो ही गोष्ट लक्षात ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.