Toilet Cleaning : कितीही स्वच्छ केलं तरी टॉयलेटमधला वास काही जात नाही, या ट्रिक्स वापरून पहा, फरक जाणवेल

घरातल्या या उपायांनी या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता
Toilet Cleaning
Toilet Cleaningesakal
Updated on

Toilet Cleaning :

बाथरूम हा घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जर आपण बाथरूम स्वच्छ ठेवले नाही तर त्यातून येणार्‍या दुर्गंधीमुळे आपले संपूर्ण घर दुषित होऊ शकते. अशा परिस्थितीत, टॉयलेट योग्य प्रकारे स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे.

तुमच्या बाथरूमच्या टॉयलेटच्या भांड्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे तुम्हालाही त्रास होत असेल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही टॉयलेटमधून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता.

Toilet Cleaning
Pink Toilet: जळगावमध्ये प्रमुख रस्त्यांवर साकारणार ‘पिंक टॉयलेट’; सुबोनियो केमिकल्स-मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम

एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवावा

जर तुमच्या टॉयलेटला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही तुमच्या बाथरूमचे एक्झॉस्ट फॅन नेहमी चालू ठेवावे. यामुळे बाथरूममधून येणारा वास काही मिनिटांतच निघून जाईल. टॉयलेटचे भांडे वापरण्यापूर्वी एक्झॉस्ट फॅन सुरू करा.

बेकिंग सोडा वापरा

जर तुम्ही घरात असलेला बेकिंग सोडा वापरलात तर तुमच्या कमोडमधून येणारा दुर्गंध नाहीसा होईल. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या टॉयलेट पॉटवर बेकिंग सोडा टाकून पहा. हे तुम्हाला आठवड्यातून एकदा नाही तर दोनदा करावे लागेल. यामुळे तुमच्या बाथरूममधून येणारा वास नाहीसा होईल.

Toilet Cleaning
Clean Mumbai : अखेर दिला दणका! गेट वे ऑफ इंडिया जवळ समुद्रात कचरा टाकणा-याला तब्बल इतक्या हजारांचा दंड

कॉफी वापरा

तुम्हाला हवे असल्यास टॉयलेट पॉटमधून येणारा वास तुम्ही कॉफीच्या मदतीने नाहीसा करू शकता. कॉफी एका भांड्यात ठेवा आणि त्या कॉफीमध्ये थोडे पाणी घाला. हे भांडे टॉयलेटमध्ये ठेवा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे करावे.

कॉफीचा सुगंध खूप स्ट्राँग असतो. त्यामुळे तो तुमच्या बाथरूममध्ये पसरेल. कॉफीच्या सुवासासमोर सर्वात वाईट वास देखील अपयशी ठरतो. अशावेळी तुमच्या बाथरूममधून कॉफीचा वास येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.