Tomato Disadvantages: टोमॅटो खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

टोमॅटो आरोग्यासाठी वाईट कसा?
Tomato Disadvantages
Tomato Disadvantagesesakal
Updated on

Tomato Disadvantages: सध्या देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. टॉमॅटोवरून सोशल मिडियाचं वातावरणही चांगलंच तापलं होतं. आता मात्र टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. टोमॅटोचा वापर सर्रास प्रत्येक भाजीत केला जातो. त्यामुळेच टोमॅटोला इतकी मागणी आहे.

टोमॅटो ही आपल्या आहारातील महत्त्वाची भाजी आहे. जेवणाची चव वाढवण्यासोबतच टोमॅटो सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये असलेले पोषक तत्व अनेक आजारांचा धोका कमी करण्यासाठी तुमच्यासाठी फायदेशीर मानले जातात.

शरीराला हायड्रेट ठेवण्यापासून ते डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यापासून, त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सीचे प्रमाण रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पण तुम्हाला माहित आहे का?, की याच्या सेवनाचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, काही आजारांमध्ये डॉक्टर देखील टोमॅटोचे सेवन न करण्याचा सल्ला देतात. जाणून घेऊया त्याचे दुष्परिणाम.(Tomato Disadvantages: Worried about tomato prices? But it is not beneficial for everyone, kidney stone is at risk from this)

Tomato Disadvantages
Tomato : नागरिकांना दिलासा; टोमॅटो आवक दुप्पट; भाव निम्म्यावर

टोमॅटो आरोग्यासाठी वाईट कसा?

यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या मते, टोमॅटो खाणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहे, परंतु काही परिस्थितींमध्ये त्याचा वापर कमी करण्याचा किंवा टाळण्याचा सल्ला दिला जातो. ज्या लोकांना किडनीचे जुनाट आजार आहे त्यांनी पोटॅशियमचे सेवन मर्यादित केले पाहिजे.

टोमॅटोमध्ये ते मुबलक प्रमाणात आढळत असल्याने किडनीच्या रुग्णांना टोमॅटोचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय टोमॅटोमध्ये ऑक्सलेटचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे किडनीचे आजारही होऊ शकतात.

किडनी स्टोनच्या रुग्णांनी टोमॅटो कमी खावे

टोमॅटो नाईटशेड वनस्पती कुटुंबातील आहेत, त्यात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात ऑक्सलेटमुळे स्फटिक एकत्र चिकटू शकतात. एक मोठा मूतखडा बनू शकतो. याच कारणामुळे ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे.

किंवा त्यांना याआधी ही समस्या होती, त्यांना टोमॅटोचे सेवन कमी करण्याचा किंवा न खाण्याचा सल्ला दिला जातो. मूत्रपिंडात अनेक वेळा खडे तयार होऊ शकतात.

Tomato Disadvantages
Nashik Tomato Rate: टोमॅटोच्या दरात ५० टक्क्यांहून अधिक घसरण! उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

दाहक आतडी रोग असलेल्यांनी काळजी घ्यावी

तुम्हाला दाहक आतडी रोग (IBD) असल्यास, तज्ञांच्या मते टोमॅटो खाल्ल्याने जळजळ होऊ शकते. नाईटशेड प्रजातींच्या वनस्पतींमध्ये अल्कलॉइड्सचे ट्रेस प्रमाण असते ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या समस्या उद्भवू शकतात. तथापि, टोमॅटो खाल्ल्याने IBD असलेल्या लोकांमध्ये धोका वाढू शकतो याचा पुरेसा पुरावा नाही. (Tomato)

त्वचेच्या समस्या वाढू शकतात

टोमॅटोमध्ये लायकोपीन आढळते, जरी त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु त्याचा एक धोका म्हणजे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो. जे लोक आधीच रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी टोमॅटोचे सेवन कमी करावे कारण ते औषधांवर प्रतिक्रिया देऊ शकतात.

याशिवाय, टोमॅटोमध्ये असलेल्या हिस्टामाइनमुळे ऍलर्जीसाठी संवेदनशील असलेल्या लोकांमध्ये अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी, एक्जिमा आणि खाज सुटणे यांसारखी लक्षणे देखील होऊ शकतात.

Tomato Disadvantages
Tomato Cultivation : अवघ्या दोन एकरात घेतले १४ लाखांचे टोमॅटो पीक

डायरिया

डायरिया असल्यास पथ्य पाळा ज्यांना डायरियाची समस्या आहे, त्यांनी टोमॅटोचे सेवन करू नये. वांत्या किंवा जुलाब होत असल्यास टोमॅटो जास्त खाल्ल्याने अस्वस्थता वाढते. टोमॅटोमध्ये साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो, जो डायरिया वाढवण्याचे काम करतो.

ॲसिडिटी

ॲसिडिटी वाढते टोमॅटोमध्ये अम्लता भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने अॅसिडिटी होऊ शकते. काही लोक टोमॅटो खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होण्याची तक्रार करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()