दातदुखीमुळे खाणे-पिणे झाले कठीण; 'हे' घरगुती उपाय केल्यानं मिळेल आराम

दातांमध्ये पोकळी निर्माण होते, मुलामा चढवणे, इन्फेक्शन, घाण हे वेदनादायक असते.
दातदुखीमुळे खाणे-पिणे झाले कठीण; 'हे' घरगुती उपाय केल्यानं मिळेल आराम
Updated on
Summary

दातांमध्ये पोकळी निर्माण होते, मुलामा चढवणे, इन्फेक्शन, घाण हे वेदनादायक असते.

आपल्या आजूबाजूला अनेकांना दातदुखीच्या समस्येने ग्रासलेले असते. दातांना सूज येणे, गरम किंवा थंड पदार्थ खाल्ल्याने दातात कळ येणे, अशा काही कारणांमुळे दातदुखी होऊ शकते. काही वेळा या वेदना असह्य होतात आणि मग डॉक्टरांची भेट घ्यावी लागते. अशावेळी दातांमध्ये पोकळी, मुलामा चढवणे, इन्फेक्शन, घाण हे इतके वेदनादायक असते की, अन्न चावून खाणेही कठीण होते. तसेच काहीही थंड प्यायल्याने त्रास होऊ शकतो.

हा त्रास होण्याचे कारण तुमच्या दातांमध्ये नसा, ऊती आणि रक्तवाहिन्यांनी भरलेला मऊ घटक असतो. तुमच्या शरीरातील अतिसंवेदनशील घटक म्हणून याकडे पाहिले जाते. जेव्हा या नसांना जळजळ होते, तेव्हा दातांतील वेदना आणखी तीव्र होतात.

दातदुखीमुळे खाणे-पिणे झाले कठीण; 'हे' घरगुती उपाय केल्यानं मिळेल आराम
Gokul Ashtami: नेमका मूहुर्त कधी आहे? 18 की 19 ऑगस्ट? जाणून घ्या पूजा पद्धती..

दात किडणे आणि ते दुखणे हे कधीकधी सहन करण्या पलिकडले होते. याचा त्रास तुम्हाला सतत जाणवत असतो. तुमच्या झोपेवरही याचा परिणाम होतो. काही घरगुती उपायांनी तुम्ही दातदुखीपासून मुक्ती मिळवू शकता. परंतु या वेदना काही दिवस तशाच राहू शकतात. अशावेळी नेमके कारण शोधण्यासाठी दातांच्या डॉक्टरांना भेट देणे आवश्यक आहे. यावर काही घरगुती उपाय आहेत जे तुम्हाला काहीसा आराम देऊ शकतात.

लसूण

एक संशोधनाच्या अहवालानुसार, लसूण दातदुखीवर नियंत्रण ठेवण्यास उपयोगी आहे. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म वेदना कमी करतात. डेंटल प्लेकवर हे प्रभावी ठरू शकते. यासाठी उपाय म्हणून तुम्ही लसूण चहाचा वापर करु शकता किंवा लसणाची कुडी चघळू शकता. याशिवाय दुखऱ्या भागावर लसणाची पेस्टही लावू शकता.

लवंग तेलचा वापर

लवंगच्या तेलात युजेनॉल आणि एसिटाइल युजेनॉल असते. यामध्ये दाहक-विरोधी आणि वेदनाशामक (वेदनाशामक) फायदे असतात. त्यामुळे दात दुखत असल्यास या तेलाच्या वापरामुळे दातदुखीवर रामबाण उपाय ठरतो.

कांदा देतो आराम

कांद्यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरियावर प्रभावीपणे काम करत असतात. दातदुखीवरीव घरगुती उपाय आणि नैसर्गिक औषध म्हणूनही कांद्याचा वापर होतो. तुम्हाला जर दातदुखीचा त्रास होत असेल तर कांद्याचा तुकडा दुखणाऱ्या जागेवर काही वेळ तसाच ठेवल्यास आराम मिळतो.

दातदुखीमुळे खाणे-पिणे झाले कठीण; 'हे' घरगुती उपाय केल्यानं मिळेल आराम
MP : रक्षाबंधनानिमित्त मध्य प्रदेशातील मंदिरात सव्वालाख लाडूंचा नैवेद्य

मीठाच्या पाण्याचा वापर

दातांच्या समस्यांवरील एक महत्वाचा उपाय म्हणजे मीठाचे पाणी. दातदुखीवरील हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यासाठी कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळून तोंड आणि दात धुण्यासाठी वापरावे. दिवसातून 2-3 वेळा हा उपाय केल्यास दातांना आराम मिळतो.

पुदिन्याचा वापर

लवंगाप्रमाणे पुदिना दातदुखी आणि तेथील जळजळ कमी करते. संवेदनशील हिरड्यांचे दुखणे दूर करण्यासाठी पुदिना औषध म्हणून काम करते. काहीवेळा तुमचे दात दुखत असतील तर तुम्ही पुदिन्याचे तेल दातांना लावू शकता. त्यामुळे कळ कमी येते.

दातदुखीमुळे खाणे-पिणे झाले कठीण; 'हे' घरगुती उपाय केल्यानं मिळेल आराम
coconut oil : त्वचेवर खोबरेल तेल लावण्याचे फायदे, काही वेळातच मिळेल आराम; वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.