Tourist Destinations : ये हसीन वादीयाँ,ये खुला आसमाँ! जोडीदारासोबत सुंदर दऱ्या अन् पर्वतरागांमध्ये हरवून जा!

ट्युलिप अन् चहाच्या गार्डनमध्ये तुम्ही कपल शूटही करू शकता
Tourist Destinations
Tourist Destinations esakal
Updated on

Tourist Destinations : हिवाळा हळूहळू संपत आहे आणि वसंत ऋतु जवळजवळ आला आहे. भारतात हिवाळा संपण्याच्या आणि उन्हाळा सुरू होण्याच्या सिझनला वसंत ऋतु म्हणतात. वसंत ऋतु जास्त काळ टिकत नाही म्हणून लोक सहसा उन्हाळा येण्याआधी प्रवासाची योजना बनवतात. जर तुम्हालाही वसंत ऋतूमध्ये भेट द्यायची असेल तर आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणे सांगत आहोत जी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरतील.

भारतात तुम्ही अशा ठिकाणांच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुम्ही पार्टनरसोबत मस्त अशा ठिकाणी जाणार असाल. तसा प्लॅन करत असाल तर या ठिकाणांचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता.

Tourist Destinations
Kashmir Tour Package : मार्चमध्ये जम्मू-काश्मीरला फिरायला जाण्याचा करा प्लॅन, IRCTC घेऊन आलय तगडं पॅकेज

काश्मीर :

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या काश्मीरचे हवामान वसंत ऋतूमध्ये (मार्च ते मेच्या सुरुवातीपर्यंत) खूप चांगले असते. यावेळी, काश्मीरमध्ये तसेच श्रीनगरमधील इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डनमध्ये फुललेल्या ट्यूलिप्सने तुम्ही मोहित व्हाल. काश्मिरी लुक करून तुम्ही फोटोशूट करू शकता. तसेच ट्युलिपच्या गार्डनमध्ये बॉलिवूडच्या गाण्यांवर रीलही शूट करू शकता.  

Tourist Destinations
PM Modi UAE Tour : UAE मध्ये पंतप्रधान मोदी अन् अध्यक्ष शेख मोहम्मद झायेद यांच्या हस्ते UPI आणि RuPay कार्ड सेवेचा शुभारंभ

मुन्नार :

जमीनीवरील स्वर्ग पहायचा असेल तर लोक स्वित्झर्लंडला जातात. पण तुम्हाला भारतातील स्वर्ग पाहयाचा असेल तर केरळला जाण्याशिवाय पर्याय नाही. कारण, केरळमध्ये असलेले हिल स्टेशन्स आणि चहाचे मळे हे तुम्हाला वेगळी अनुभूती देतात. मुन्नार वसंत ऋतुमध्ये नंदनवनात बदलते. या हंगामात येथील तापमान 19 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहते. इथल्या पर्वतांसोबतच थंड वातावरणाचा आनंद लुटता येतो.

शिलाँग

पूर्व स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे शिलाँग वसंत ऋतूमध्ये खूप छान असते. जेव्हा इथे रोडोडेंड्रॉन आणि ऑर्किडची फुले येतात तेव्हा संपूर्ण शहर खूप सुंदर दिसते. या फुलांच्या झाडांच्या रस्त्यावरून जोडीदाराचा हात हातात घेऊन चालणं हे अविस्मरणीय ठरतं.  

Tourist Destinations
Malaysia Tour : मलेशियाच्या पेनांगमध्ये भारतीय पर्यटकांसाठी पायघड्या

कूर्ग (कर्नाटक)

भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे कूर्ग कर्नाटकातील कॉफीचे मळे आणि धुक्याने दाटलेल्या टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे. वसंत ऋतूमध्ये येथील टेकड्या कॉफीच्या फुलांच्या सुगंधाने आणि कॉफीच्या झुडुपांना पांढऱ्या शुभ्र फुलांनी बहरून टाकतात.   

गुलमर्ग (काश्मीर)

गुलमर्गला एप्रिल ते जूनच्या आसपास भेट द्यावी. हा असा हंगाम आहे जेव्हा प्रवाशांना हिरवेगार गवताळ प्रदेश आणि बर्फाच्छादित पर्वत पाहायला मिळतात. वसंत ऋतूमध्ये, बर्फ वितळण्यास सुरवात होते, रंगीबेरंगी फुलांचे गालिचे प्रकट होते.

Tourist Destinations
CM Foreign Tour: आदित्य ठाकरेंच्या पोस्टनंतर परदेश दौरा रद्द झाला का? उदय सामंत म्हणाले...

उटी (तामिळनाडू)

निलगिरी टेकड्यांमध्ये वसलेले, उटी हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे जे चांगल्या हवामानासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. वसंत ऋतूमध्ये, येथील वनस्पती बागांना रंगांनी भरते ज्यामध्ये रोडोडेंड्रॉन, ऑर्किड आणि गुलाब यांसारखी फुलं फुललेली असतात.

Tourist Destinations
Thailand Tour : निवांत वेळ घालवण्यासाठी थायलंडला जायला लागतंय; जाणून घ्या खर्च, अन् काय काय पहाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.