Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा सण अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सर्वत्र मकर संक्रांतीची धामधूम पहायला मिळत आहे. मकर संक्रांतीनिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. ज्यामध्ये अनेक गोडाधोडाच्या कार्यक्रमांचा समावेश आढळून येतो.
मकर संक्रांतीपूर्वी भोगी आणि लोहरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारी (१४ जानेवारीला) भोगी आणि लोहरी देशभरात साजरी केली जाणार आहे. भोगी आणि लोहरीनिमित्त देखील अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्याची परंपरा आपल्याकडे आहे.
आज आपण खास मकर संक्रांतीनिमित्त घराघरात बनवल्या जाणाऱ्या खास पारंपारिक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. कोणते आहेत हे पदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.
तिळाच्या लाडूंशिवाय आणि तिळगूळांशिवाय मकर संक्रांतीचा सण हा अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तीळ आणि गूळ यांचा वापर करून हे स्वादिष्ट लाडू बनवले जातात आणि तितक्याच आवडीने ते खाल्ले देखील जातात.
मकर संक्रांती सणाचा महत्वाचा भाग म्हणजे तीळ आणि गूळ आहेत. हे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी तील कोरडे भाजून घेतले जातात. त्यानंतर गुळाचा पाक बनवला जातो. त्यानंतर, या पाकात तीळ मिसळून त्यापासून तिळाचे लाडू बनवले जातात.
महाराष्ट्रातील प्रत्येक सण-समारंभांना किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये पूरणपोळीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जाते. मकर संक्रांतीला ही पूरणपोळी महाराष्ट्रातील घराघरांमध्ये बनवली जाते.
या पुरणपोळीमध्ये हरभरा डाळ आणि गुळाचा वापर केला जातो. त्यानंतर, गव्हाच्या पीठाची कणीक मळून त्यामध्ये हे गूळ आणि डाळीचे सारण भरून पुरणपोळी लाटली जाते आणि तूपाचा वापर करून खरपूस भाजली जाते. ही पुरणपोळी दूध, गुळवणी किंवा कटाच्या आमटीसोबत चवीने खाल्ली जाते.
पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांतीला पायेश हा खास गोड पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ करण्यासाठी दूधात तांदूळ शिजवले जातात. त्यानंतर, त्यात गोड चव आणण्यासाठी खजूर आणि गुळाचा वापर केला जातो.
बिहारमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी स्वादिष्ट खिचडी तयार केली जाते. या खिचडीमध्ये तूपाचा भरपूर वापर केला जातो. या खिचडीमध्ये टोमॅटो, गाजर आणि फ्लॉवर यांसारख्या भाज्यांचा वापर केला जातो. त्यामुळे, खिचडी पौष्टिक होते. ही स्वादिष्ट खिचडी कोथिंबीरच्या चटणीसोबत आवडीने खाल्ली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.