Diwali Recipe : चिवडा-करंजीसोबत दिवाळीत बनवा पारंपरिक कडबोळी, रेसिपी आहे सोपी

Diwali Recipe In Marathi : या रेसिपीचा वापर करून तुम्ही पारंपरिक पद्धतीने कडबोळी बनवू शकता. ज्यामुळे घरातील वृद्ध व्यक्तीही तुमचे कौतुक करतील.
Diwali Recipe
Diwali Recipeesakal
Updated on

Diwali Recipe :

बाहेर बेकरीत मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा घरी बनवलेले फराळाचे पदार्थ कधीही चांगले असतात. ते आरोग्यदायी असतात. तुम्ही फराळात चकली, करंजी, चिवडा, लाडू बनवला असेल. तो आवडीने खाल्लाही असेल. पण, आजकाल मोजकेच पदार्थ बनवले जातात. फराळाच्या पदार्थांमध्ये चिरोटे, कडबोळी बनवले जात नाहीत.

कारण हे पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी कृती अन् त्यासाठीची तयारी करायला वेळ जातो. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने कडबोळी कशी बनवायची हे सांगणार आहोत. या रेसिपीचा वापर करून तुम्ही पारंपरिक पद्धतीने कडबोळी बनवू शकता. ज्यामुळे घरातील वृद्ध व्यक्तीही तुमचे कौतुक करतील.

Diwali Recipe
Diwali Special Stocks: कमाईची सुवर्णसंधी! दिवाळीत कोणते शेअर्स खरेदी करणार? पहा टॉप 10 शेअर्सची यादी

साहित्य -

४ वाट्या मैदा, ८ टे. स्पून कडकडीत तेल (मोहनाला), मीठ चवीनुसार, १ टी स्पून काळे मिरे, १ टी स्पून जिरे, अर्धा टी स्पून ओवा अर्धवट कुटून, तळण्याकरता तेल अथवा वनस्पती तूप

कृती -

मैदा चाळून घ्यावा. त्यात अर्धवट कुटून ओवा, मिरे व जिरे घालावे. मीठ घालून कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावा. एक तासाने पीठ चांगले मळून त्याचे ६ भाग करावेत व १ भागाची पोळपाटावर पातळ मोठी पोळी लाटावी.

Diwali Recipe
Jalgaon Diwali Festival : घर-अंगणाच्या झगमगाटासाठी पणत्या बाजारात! ग्राहकांकडून खरेदीलाही सुरवात

कातण्याने अथवा सुरीने शंकरपाळी कापावीत. पसरट कढईत तेल अथवा तूप तापवून मंद आचेवर गुलाबी रंगात तळावीत. वरील साहित्यात अंदाजे अर्धा किलो खारी शंकरपाळी होतात.

मिरे व जिरे कुटून घातल्याने खमंगपणा येतो. मीठपण किंचित जास्त असावे. बरेच दिवस टिकतात. प्रवासात पण नेता येतात. पातळ लाटल्याने फुलून येऊन कुरकुरीत होतात. जाड लाटली तर नंतर मऊ पडतात. मंद आचेवरच तळावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.