Travel Tips in marathi
Travel Tips in marathi

Travel Tips : विमानतळावर हरवलेलं सामान कसं शोधायचं, सामान हरवू नये म्हणून काय करता येईल?

Aditi Rao Hydari :विमानतळावर सामान गहाळ होण्याच्या अनेक घटना झाल्या आहेत. या घटनेला आता अभिनेत्री आदिती रावही बळी पडली.
Published on

Travel Tips :

हिरामंडी फेम अदिती राव हैदरी नुकतीच लंडनला गेली होती. तिथे एअरपोर्टवर तिचे सामान गहाळ झालं. आणि हे सामान तिला चक्क 45 तासानंतर मिळालं. तिने या घटनेची माहिती सोशल मीडियावरून शेअर केली. तर त्यावर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या. तुम्हालाही कधीतरी अशा गोष्टीचा सामना करावा लागू शकतो.

विमानतळावर सामान गहाळ होण्याच्या अनेक घटना झाल्या आहेत. या घटनेला आता अभिनेत्री आदिती रावही बळी पडली. लागलं त्यामुळेच आज आपण जाणून घेऊया विमानतळावर सामानाच्या बाबतीत काय काळजी घ्यावी ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होणार नाही

Travel Tips in marathi
Monsoon Travel : मोह आवरा; स्वतःला सावरा! पावसाळी पर्यटन करताना अतिसाहसाने घडू शकते दुर्घटना

विमानतळावर सामान हरवण्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. सामान मिळेपर्यंत काळजी करत थांबावं लागतं. आणि दुसरी गोष्ट जर सामान हरवले किंवा मिळालेच नाही. तर त्या बदल्यात कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. सामान हरवल्याची तक्रार करायला गेल्यास कोणतेही ठोस उत्तर विमानतळ प्रशासनाकडून देण्यात येत नाही.

सामान हरवलं तर काय करावे

सर्वात आधी हे लक्षात घ्या की, तुमचे सामान हरवू नये याची पूर्ण काळजी घ्या. आणि जर ते हरवलं तर जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर पॅसेंजर ईर्रेग्युलरटी रिपोर्ट (PIR) दाखल करावा. (Travelling Tips)

Travel Tips in marathi
Monsoon Travel : पावसाळ्यात भटकंतीला जाताय? मग, 'ही' खबरदारी नक्की घ्या.!

या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या सामानाची संपूर्ण माहिती द्यावी लागते. तसेच तुमचा पूर्ण पत्ता आणि फोन नंबर सुद्धा द्यावा लागतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ही तक्रार दाखल केल्यानंतर तुम्ही त्याची एक कॉपी तुमच्याकडे ठेवा. यामध्ये त्या फॉर्मचा नंबर सुद्धा असेल अशी कॉपी ठेवा.

तुमचं सामान सापडले आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला हा क्लेम नंबर मदत करेल. एअरलाइनच्या वेबसाईटवर हा क्लेम नंबर टाकून तुम्ही तुमचं सामान सापडल्याची खात्री करू शकता.

सामान सापडलेच नाही किंवा तुटले असेल तर काय करावे

 तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा जर तुमचं सामान सापडलं नाही. तर एअरलाइनच्या वेबसाईटवर नवीन रिपोर्ट दाखल करा. या फॉर्ममध्ये हरवलेल्या सामानाची संपूर्ण माहिती द्या. त्यामध्ये किती सामान होतं काय काय होतं, त्याची किंमत किती होती, सामान खरेदी कधी केलं होतं अशी सगळी माहिती द्या.

जर सामान तुटले असेल तर त्यासंदर्भात ही तक्रार दाखल करता येते. फक्त एकच गोष्ट लक्ष देऊन करावी लागते ती म्हणजे सामान हरवल्यानंतर 24 तासाच्या आतच हे तक्रार केली तरच ती ग्राह्य धरली जाते.

Travel Tips in marathi
Summer Travel : मे महिन्यात कूल राहायचंय? मग, फिरायला जाण्याचा करा प्लॅन, ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

सामान हरवूच नाही म्हणून काय करावे

सर्वात आधी तर तुमच्या सामानावरती प्रत्येकी दोन टॅग लावा. एक सामानाच्या आतील बाजूला अन् दुसरा बाहेरील बाजूला. दोन्ही टॅग वरती तुमचं नाव, पत्ता, कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहा. सामानावर लावलेल्या टॅग्सवर चिन्ह किंवा कृती काढा. ज्यामुळे ते तुमचेच सामान आहे हे लगेच लक्षात येईल.

तुम्ही सतत विमानाने प्रवास करत असाल तर प्रत्येक वेळी नवीन टॅग वापरा. ज्यामुळे विमानतळावरील कर्मचाऱ्यांना तुमच्या नवीन सहलीची माहिती लगेच मिळते. त्यामुळे सामान हरवण्याची शक्यता कमी होते.

तुम्हाला तुमच्या सामान सुरक्षितपणे न्यायचं असेल, किंवा परत मिळवायचे असेल तर ही गोष्ट फॉलो करावी लागेल. ती म्हणजे तुमच्या फ्लाईटच्या टाइमिंगच्या आधीच तुम्ही एअरपोर्टवर जा. ज्यामुळे खूप घाईत तुम्हाला सामानाचे चेकींग करावे लागणार नाही. आणि तुमच्याकडे बराच वेळ असेल त्यामुळे तुम्ही व्यवस्थित काळजीने सर्व गोष्टी कराल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.