भारतातील लोक खाण्याचे शौकीन आहेत.तसेच इतरांना वेगवेगळे पदार्थ खायला देण्याचेही आहेत. केवळ खायला बनवलं म्हणजे झालं असं नाहीतर ते तितक्याच प्रेमाने खायला घालण्याची कलाही आपल्या संस्कृतीत आहे. म्हणूनच तर इतर देशांच्या वेगवेगळ्या खाण्याच्या पद्धतीत भारतीय पदार्थ नेहमीच अव्वल ठरतात.
भारतात सध्या स्ट्रीटफूडची क्रेझ आहे. भारतातल्या प्रत्येक गल्लीत एखादी खाऊ गल्ली निर्माण झाली आहे. भारतीय पदार्थांची क्रेझ परदेशातही पसरली आहे. भारतीय खाद्यपदार्थात इतकी विविधता आहे की इथल्या लोकांनीही सगळे पदार्थ चाखले असतीलच असे नाही.
जे लोक खाण्याचे शौकीन आहेत, ते आपोआप भेट देण्याच्या ठिकाणांचा शोध घेतात. पण, इथे आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणाविषयी सांगणार आहोत, ज्याची चव रसिकांनाही माहिती नसेल. या ठिकाणाचे नाव आहे- मध्य प्रदेश.
मध्य प्रदेशला नैसर्गिक धनसंपत्तीचा अनमोल खजिना लाभला आहे. येथील पारंपारिक गावे, मोठे किल्ले आणि विविध प्रकारचे वन्य प्राणी भारतातील इतर कोणत्याही राज्यात आढळत नाहीत. मध्य प्रदेश हे केवळ भेट देण्याच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक नाही तर त्यासोबतच मध्य प्रदेश आपल्या स्वादिष्ट पदार्थांसाठी देखील ओळखला जातो.
जर तुम्हाला खाद्यपदार्थ आणि प्रवास या दोन्ही गोष्टींची आवड असेल तर तुम्ही मध्य प्रदेशातील या ठिकाणाला नक्कीच भेट द्यावी.
भोपाळ खास आहे
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ फिरण्यासाठी फारशी प्रसिद्ध नाही. पण इथल्या पदार्थाची चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थ खूप चविष्ट असतात. इथल्या पदार्थाची चव तुम्ही क्वचितच विसरू शकाल.
पोहे जिलेबी
तुम्ही भोपाळमध्ये असाल तर इथले पोहा जिलेबी खायला विसरू नका. भोपाळमधील इतवारा रोडजवळ तुम्हाला कल्याण सिंगचा स्वाद भंडार दिसेल. हे ठिकाण प्रसिद्ध पोहे जिलेबीसाठी प्रसिद्ध आहे. हे दुकान सकाळी ७ वाजता उघडते. तेव्हापासून येथे लोकांची गर्दी वाढत आहे.
भोपाळीतील लोकांना जेवणाची इतकी आवड आहे की त्यांनी त्यांच्या रस्त्याचे नाव चटोरी गल्ली ठेवले आहे. हा परिसर जुन्या दिल्लीसारखा आहे. मटण पाया सूप येथे उपलब्ध आहे. हे सूप मंद आचेवर शिजवलेल्या मटणापासून बनवले जाते आणि घट्ट रश्श्यासोबत सर्व्ह केले जाते.
याशिवाय इथली थंडगार रसमलाईही खूप प्रसिद्ध आहे. रबडी ची बर्फी आणि चवीचे सरबत मिसळून त्यावर गुलाबपाणी पानांच्या द्रोणमध्ये सर्व्ह केले जाते. त्याची चव खरोखरच अप्रतिम आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जर तुम्ही भोपाळला गेलात तर इथल्या पदार्थाचा आस्वाद घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.