ट्रेंडी ‘मान्सून’वेअर

पहिला पाऊस, मातीचा सुगंध, हातात गरमागरम चहा किंवा कॉफी आणि मन चिंब करून जाणाऱ्या असंख्य आठवणी. पावसाशी प्रत्येकाचे असेच काही खास नाते असते.
Trendy Monsoon wear
Trendy Monsoon wearsakal
Updated on

- पृथा वीर

पहिला पाऊस, मातीचा सुगंध, हातात गरमागरम चहा किंवा कॉफी आणि मन चिंब करून जाणाऱ्या असंख्य आठवणी. पावसाशी प्रत्येकाचे असेच काही खास नाते असते. आता या पावसाचा काही नेम नाही. तो पडतो, तेव्हा आपण घरी असतो, कधी ऑफिसमध्ये, कधी पावसात अडकलो म्हणून कुठे आडोसा शोधलेला असतो. अशा सुखावह दिवसात कपडे हा घटक अतिशय महत्त्वाचा.

या दिवसात आपण घरी असो किंवा बाहेर, पावसाळ्याला अधिक आनंददायी करताना कपड्यांची भूमिका महत्त्वाची. याही दिवसात टापटीप राहण्याची आपली मजा. अर्थातच या दिवसात प्रेझेंटेबल असणे आव्हान असले, तरीही थोडी तयारी केली तर हेही चँलेंज अवघड नाही.

तुमची स्टाईल काहीही असली, तरी पावसाळ्यात स्टायलिश दिसण्याचे अनेक पर्याय तज्ज्ञ सांगतात. म्हणूनच पावसाळा हा फॅशनप्रेमींसाठी एक पर्वणीच असतो. या दिवसांत हलक्या फॅब्रिक्सची निवड करा, असे फॅशन एक्सपर्ट सांगतात. पावसाळ्यातील दमट हवामान आणि ओलावा म्हणजे ॲलर्जीला निमंत्रण. त्यामुळे पुलोव्हर्स, डेनिम, लोकरीचे कपडे, सिल्कसारख्या फॅब्रिकचा कमीत कमी वापर करावा. तसेच लिननचे कपडे घालणेही टाळावे.

पावसाळ्यात सुती, शिफॉन, मलमलचे कपडे परिधान करावेत. पॉलिस्टरचे कपडेही चांगला पर्याय ठरू शकतात. हे कपडे लवकर कोरडे होतात आणि स्कीन फ्रेंडली असतात. पावसाळ्यात कपडे नीट वाळले नाहीत, तर ते त्वचेसाठी योग्य नाही. म्हणून कपड्यांचे फिटिंग सैल हवे. अनेकींना एकदम टाइट फिटिंगचे कपडे आवडतात; पण पावसाळ्यात एकदम घट्ट फिटिंगचे कपडे घालून वावरताना अवघडल्यासारखे वाटते.

या मोसमात सुटसुटीत आऊटफिट जसे क्रॉप टॉप, सैल पँट, स्कर्ट, प्लाझो, शॉर्ट, मिडी किंवा प्लेटेड स्कर्ट्‌स छान दिसतात. सुती वन-पीस किंवा ड्रेस तुमच्या सौंदर्यात भर घालतात. लूज-फिटिंग पँट आणि जॉर्जेट साडीही छान दिसते. ऋतूनुसार कपड्यांची निवड करताना रंगांनाही तितकेच महत्त्व आहे. उत्तम रंगसंगती व्यक्तिमत्त्वाला अधिक खुलवण्यास मदत करते, असे फॅशन डिझायनर्स सांगतात.

पावसाळ्यात फिकट रंगाचे कपडे न वापरता गडद रंगांची निवड करा. गडद रंगांच्या कपड्यांवर डाग लवकर दिसून येत नाहीत. फ्लोरल अथवा ब्लॉक प्रिंट कपडेसुद्धा एकदम खुलून दिसतात. पावसाळ्यात कपड्यांसोबतच शूज, बॅग, मेकअप आणि ॲक्सेसरीज महत्त्वाच्या.

या ऋतूत पावसाळी चपलांचा जास्तीत जास्त वापर करा. कॅनव्हास किंवा कापडी शूज पावसाळ्यात खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजूबाजूला ओलावा आणि चिखल असल्याने जास्त उंच आणि पूर्ण फ्लॅट चपलांचा वापर करू नका.

फूटवेअर वॉटरप्रूफ हवे. गमबूट, जेली सँडल असो किंवा वॉटरप्रूफ स्नीकर्स तुमचे पाय कोरडे ठेवतात. सोबत नायलॉन बॅग वापरण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. नायलॉन बॅग वापरा. नायलॉन बॅगमुळे बॅगेमधील वस्तूंचे नुकसान होणार नाही. घराबाहेर पडताना जास्त मेकअप आणि ॲक्सेसरीज घालू नका, असेही एक्सपर्ट सांगतात. मग पाऊस, छान, सुंदर आणि साधा फॅशन सेन्स पावसाळ्यातही उठून दिसतो. कॉस्च्युमच्या पलीकडे तुमचा आत्मविश्वास या मॉन्सूनला ट्रेंडी बनवेल, यात शंका नाही.

हे लक्षात ठेवा

  • पावसाळ्यात लवकर कोरडे होणारे कपडे आवश्यक

  • डेनिम किंवा अगदी भारी फॅब्रिकचे कपडे नकोत. कारण जड कपडे सुकायला जास्त वेळ घेतात.

  • आउटरवेअर ॲक्सेसरीज म्हणून स्टायलिश रेनकोट किंवा वाटरप्रूफ जॅकेट जवळ ठेवा

  • छत्री विसरू नका. थोडे फिरलात, तर सुंदर प्रिंटची स्टायलिश छत्री मिळेल. कोसळणाऱ्या पावसात स्टायलिश छत्रीवरचे फोटोशूट तुमच्यासाठी छान आठवण तयार करू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.