Hair Care in Monsoon: डोक्याला खाज येतेय, त्रस्त आहात?, मग ट्राय करा या टिप्स

डोक्याला खाज सुटणे ही तशी सामान्य समस्या आहे. या समस्येपासून कित्येक जण त्रस्त असताना आपण पाहतो.
hair
hair sakal
Updated on

पावसाळ्यात डोक्यात खाज येण्याची समस्या खूप वाढते. केस आणि टाळूमध्ये जास्त ओलावा असणे हे याचे मुख्य कारण आहे. हा ओलावा टाळूमध्ये असलेल्या घाणीसोबत एकत्रित होऊन डोक्यात कोंडा बनतो, त्यामुळे केस गळणे हळूहळू सुरू होते. याच कारणामुळे पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक मानले जाते. पावसाळ्यात केस झपाट्याने गळतात हेही खरं आहे.

तुम्हालाही केस गळणे किंवा कोंडा होण्याची समस्या आहे का? बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांऐवजी तुम्ही घरच्या घरी केसांची चांगली काळजी घेऊ शकता. येथे आम्ही तुम्हाला अशाच 3 हेअर मास्कबद्दल सांगणार आहोत जे कोंड्यासह केसांच्या अनेक समस्यांवर एकमेव उपाय आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्या…

hair
Walking For Belly Fat : पोटाची चरबी कमी करण्यासाठी चालण्याचा खरंच फायदा होतो का? तज्ज्ञ सांगतात...

दही आणि मध

हे करण्यासाठी एका कपमध्ये थोडे दही घ्या. त्यात प्रत्येकी एक चमचा मध आणि लिंबाचा रस घाला. हेअर मास्कची पेस्ट थोडा वेळ बाजूला ठेवा आणि नंतर थेट टाळूला लावा. लक्षात ठेवा की आंघोळ करण्यापूर्वी किंवा शॅम्पू करण्यापूर्वी हा मास्क केसांना लावावा. यामुळे कोंडा तर दूर होईलच पण केसांना चांगले पोषणही मिळेल.

मेथी दाण्याचा हेअर मास्क

मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक गुणधर्म किंवा घटक असतात जे केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही फायदेशीर असतात. मेथीच्या दाण्यांचा मास्क बनवण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी हिबिस्कसच्या पानांची पेस्ट बनवा आणि मेथीच्या पेस्टमध्ये मिसळा. हेअर मास्क टाळूला लावा आणि अर्ध्या तासानंतर धुवा. डोक्याची खाज दूर करण्यासाठी याचा उपयोग होईल.

hair
Breakfast Time : नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती? 90% टक्के लोकांना नाश्त्याची योग्य वेळ माहिती नाही

एवोकॅडो मास्क

केसांची निगा राखण्यासाठी अॅव्होकॅडोही उत्तम मानला जातो. एवोकॅडोचा मास्क बनवण्यासाठी त्याच्या पल्पची पेस्ट बनवा आणि त्यात ऑलिव्ह ऑईल सोबत मध मिसळा. पेस्ट टाळूवर लावा आणि सुमारे 30 मिनिटे ठेवा आणि नंतर शॅम्पू करा. या रेसिपीमुळे केसही मुलायम होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.