Harmonal Imbalance : शरीरातील हार्मोनल असंतुलनाकडे करू नका दुर्लक्ष, 'या' आयुर्वेदिक वनस्पतींपासून मिळेल आराम

Harmonal Imbalance : सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
Harmonal Imbalance
Harmonal Imbalanceesakal
Updated on

Harmonal Imbalance : सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. महिलांना तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांपैकीच एक असणारे हार्मोनल असंतुलन (Harmonal Imbalance) हे एक आहे. या समस्येमुळे महिला त्रस्त राहतात.

या समस्येमुळे मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, मूड बदलणे, कामात मन न रमणे, चिंता, नैराश्य, टेंन्शन, थकवा येणे, केस पांढरे होणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात. या सर्व समस्या वरवर सामान्य वाटत असल्या तरी, देखील याचा आरोग्यावर खोलवर परिणाम होतो.

या परिस्थितीमध्ये अनेक महिला विविध औषधांच्या मदतीने त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, यासाठी तुम्ही गोळ्या औषधांव्यतिरिक्त आयुर्वेदाची देखील मदत घेऊ शकता. आयुर्वेदामध्ये अशा अनेक औषधी वनस्पतींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. या औषधी वनस्पतींमुळे तुम्हाला हार्मोनल असंतुलनापासून आराम मिळू शकतो. कोणत्या आहेत त्या औषधी वनस्पती? चला तर मग जाणून घेऊयात.

Harmonal Imbalance
Women’s Health : महिन्यातून दोनवेळा मासिक पाळी येते? घाबरू नका,समजून घ्या असं का होतं ते?

शतावरी

ही वनस्पती महिलांच्या आरोग्यासाठी रामबाण औषधी मानली जाते. शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमीन ई, व्हिटॅमिन क, प्रथिने, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस इत्यादी पोषकघटकांचे मुबलक प्रमाण आढळून येते. लोहाच्या वाढीसाठी शतावरी अतिशय फायदेशीर आहे.

शतावरीमुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. यासोबतच शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्याचे काम शतावरी करते. शतावरीचे सेवन केल्याने शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी राखण्यास मदत होऊ शकते. हार्मोन्सचे असंतुलन झाल्यास शतावरीचे सेवन करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो.

अश्वगंधा

शतावरीसोबतच अश्वगंधा या औषधी वनस्पतीचे आयुर्वेदामध्ये वर्णन केल्याचे आढळून येते. अनेक औषधांमध्ये अश्वगंधाचा वापर आवर्जून केला जातो. ही औषधी वनस्पती आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. रक्तदाबाच्या रूग्णांसाठी आणि हार्मोनल असंतुलनासाठी अश्वगंधा रामबाण औषधी आहे.

अश्वगंधा पावडरच्या स्वरूपात मिळते. तुम्ही या पावडरपासून काढा बनवून त्याचे सेवन करू शकता. यामुळे, मासिक पाळीचे चक्र सुधारण्यास मदत होते. तसेच, तणाव कमी करण्यास आणि चांगली झोप येण्यासाठी अश्वगंधा फायदेशीर ठरते. शिवाय, आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी आणि पुनरूत्पादक हार्मोन्स नियंत्रित करण्यास अश्वगंधा लाभदायी ठरू शकते.

Harmonal Imbalance
Working women health diseases: नोकरदार महिलांमध्ये आढळतात ‘हे’ सहा प्रकारचे आजार आणि गंभीर त्रास

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.