महिलांमध्ये युरिन इन्फेक्शनचा त्रास होण्याची प्रकरणे वाढली आहेत. यूटीआय अर्थात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा महिलांना अनेकदा त्रास होतो. ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसून येते. हा संसर्ग स्त्रियांमध्ये सामान्य आहे. आणि जवळजवळ प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात कधी ना कधी या समस्येचा सामना करावा लागला आहे.
ही समस्या केवळ महिलांच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होत आहे. खाण्यातील बदल, योग्य स्वच्छता न ठेवणे यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होतो. संसर्गामध्ये लघवी करताना जळजळ होणे, लघवी करताना वेदना होणे, दुर्गंधी येणे किंवा कमी लघवी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.