Tulsi Vivah 2024 : तुलसी अन् भगवान विष्णूंचा विवाह का केला जातो, काय आहे त्यामागील कथा

उद्या एकादशीच्या मुहूर्तावर तुळशी विवाहही संपन्न होत आहे.
Tulsi Vivah 2024
Tulsi Vivah 2024esakal
Updated on

Tulsi Vivah 2024 :

आज देवउठणी एकादशी आहे. उद्या म्हणजे द्वादशीला भगवंत विष्णूंचा विवाह तुलसीसोबत लागतो. म्हणजेच उद्या तुलसी विवाह आहे. धार्मिक मान्यतांनुसार, या शुभ प्रसंगी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रातून जागे होतात. म्हणजे चातुर्मासाची सांगता होते. भगवान विष्णू आता पुन्हा सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी घेतात.

उद्या एकादशीच्या मुहूर्तावर तुळशी विवाहही संपन्न होत आहे. अशा स्थितीत देवूठाणी एकादशीलाही तुळशीची पूजा केली जाते. या तुलसी विवाहाची पौराणिक कथा आहे, ती कोणती हे जाणून घेऊयात. (Tulsi Vivah 2024)

Tulsi Vivah 2024
Diwali 2024 Tulsi Upay: दिवाळीत करा तुळशी मंजुळाचे 'हे' खास उपाय, माता लक्ष्मीची कायम राहील कृपादृष्टी

भगवान शंकरांनी त्याची तेजस्वी उर्जा समुद्रात टाकली त्यातून अतिशय हुशार मुलाचा जन्म झाला. या मुलाचे नाव जालंधर होते, जालंधरनंतर एक पराक्रमी राक्षस राजा झाला. जालंधर अतिशय राक्षसी स्वभावाचे होते. जालंधरचा विवाह दैत्यराज कलानेमी यांची कन्या वृंदा हिच्याशी झाला होता. वृंदा ही भगवान विष्णूंची खूप मोठी भक्त असलेली एक सद्गुणी स्त्री होती, तिच्या या गुणांमुळे तिचा पती जालंधर अधिक शक्तिशाली झाला आणि राक्षसी वृत्तीने इतरांना त्रास देऊ लागला. (Tulsi Vivah)

देवांचा देव महादेवही जालंधरला पराभूत करू शकले नाहीत. भगवान शिवासह देवांनी जालंधराचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूची प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी जालंधरचा वेश धारण करून वृंदा या सद्गुणी स्त्रीची पवित्रता नष्ट केली.  वृंदाची पवित्रता संपल्यावर जालंधरची शक्ती संपली आणि भगवान शिवाने जालंधरचा वध केला. जेव्हा वृंदाला भगवान विष्णूच्या भ्रमाबद्दल कळले तेव्हा तिने क्रोधित होऊन भगवान विष्णूला काळा दगड (शालिग्राम दगड) होण्याचा शाप दिला.

Tulsi Vivah 2024
Tulsi Water Benefits : रोज सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' फायदे

भगवान विष्णूंना दगडाचे बनलेले पाहून सर्व देवी-देवतांमध्ये एकच आक्रोश झाला, मग माता लक्ष्मींनी वृंदाची प्रार्थना केली, तेव्हा वृंदाने जगाच्या कल्याणासाठी आपला शाप मागे घेतला आणि जालंधरसह स्वतःही सती झाली. वृंदाने भगवान विष्णूंना शापातून मुक्त केले पण स्वत: आत्महत्या केली. जिथे वृंदा जळून राख झाली, तिथे तुळशीचं रोप उगवलं.

Tulsi Vivah 2024
Tulsi Mala Niyam : वारकरी संप्रदायात मानाचं स्थान असलेल्या तुळशीमाळेला घालताना 'या' चुका कधीही करू नका नाहीतर..

भगवान विष्णू वृंदाला म्हणाले: हे वृंदा. तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव-उठवणी एकादशीचा दिवस तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो. भगवान विष्णूने वरदान दिले की जो कोणी तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रुपाशी करेल त्याला या लोकात आणि परलोकात अपार कीर्ती मिळेल. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.