Types of Trains : एक्स्प्रेस, मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये फरक काय ?

भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन्स मर्यादित तासाच्या अंतराने धावतात.
Types of Trains
Types of Trainsgoogle
Updated on

मुंबई : सध्याच्या युगात एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचे असेल तर रेल्वेने प्रवास करणे सर्वोत्तम मानले जाते. ट्रेनने प्रवास करताना प्रवासी सुरक्षित राहतो आणि पैसेही खूप कमी खर्च होतात. म्हणूनच अनेक वेळा भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी देखील म्हटले जाते.

तुम्ही देखील ट्रेनने प्रवास करत असाल. पण एक्स्प्रेस, मेल-एक्स्प्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेनमध्ये काय फरक आहे, असे जर तुम्हाला विचारले तर तुमचे उत्तर काय असेल. कदाचित अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल. त्यामुळे कधी कधी ते चुकीच्या ट्रेनमध्ये चढतात. हेही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Types of Trains
Numberplate : वाहन क्रमांकांच्या पाट्यांना वेगवेगळे रंग का असतात माहितीये का ?

मेल एक्सप्रेस ट्रेन

भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन्स मर्यादित तासाच्या अंतराने धावतात. यापैकी एक मेल ट्रेन-एक्स्प्रेस ट्रेन आहे. मेल-एक्स्प्रेस प्रामुख्याने प्रमुख शहरे तसेच लांब पल्ल्याच्या स्थानकांना जोडते.

मेल-एक्स्प्रेस ट्रेनचा वेग सुपरफास्टपेक्षा कमी आहे. ही ट्रेन ताशी 50 किमी वेगाने धावते. ही ट्रेन थांबत-थांबत प्रवास करते. सहसा मेल-एक्स्प्रेसची संख्या १२३ ___ इ. ने सुरू होते. जसे- पंजाब मेल, मुंबई मेल, कालका मेल.

एक्सप्रेस ट्रेन

असे म्हटले जाते की एक्सप्रेस ट्रेन ही भारतातील अर्ध-प्राधान्य रेल्वे सेवा आहे. एक्स्प्रेस ट्रेन ताशी 55 किलोमीटरहून अधिक वेगाने धावते. एक्सप्रेस ट्रेनचा वेग मेल-ट्रेनपेक्षा जास्त असतो. मात्र, त्याचा वेग सुपरफास्ट ट्रेनपेक्षा कमी आहे.

एक्सप्रेस ट्रेन कोणत्याही स्टेशनवर थांबत नाही. एक्स्प्रेस ट्रेनचे नाव शहर, ठिकाण किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावावर ठेवता येते. त्यात जनरल, स्लीपर आणि एसी कोच असतात.

Types of Trains
Government Job : पदवी आणि पदविका धारकांसाठी रेल्वेत नोकरीची संधी

सुपरफास्ट ट्रेन

सुपरफास्ट ही एक ट्रेन आहे जी एक्सप्रेस किंवा मेल-एक्सप्रेसपेक्षा जास्त वेगाने धावते. सुपरफास्ट ट्रेनचा वेग ताशी 110 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. सुपरफास्ट गाड्यांना सहसा कमी थांबे असतात.

सुपरफास्ट ट्रेन मेल-एक्सप्रेस किंवा एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत काही अतिरिक्त भाडे आकारते. ज्या मार्गावर या गाड्या धावतात त्या मार्गावर या गाड्यांना प्राधान्य दिले जाते. ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाते. त्यात जनरल, स्लीपर आणि एसी कोच असतात.

पॅसेंजर ट्रेन

पॅसेंजर ट्रेन ही कमी अंतर कापणारी ट्रेन आहे. एक प्रकारे, ही एक लोकल ट्रेन आहे जी एका शहरातून दुसऱ्या शहरात धावते. त्यातील सर्व डबे हे जनरल डबे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.