Aadhaar : व्हॉट्सअ‍ॅप किंवा ईमेलवर शेअर करू नका डॉक्युमेंट्स; आधार अपडेट करणाऱ्यांना केंद्राचा गंभीर इशारा!

UIDAI X Post : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला असेल, तर सावधान होण्याची गरज आहे.
Aadhaar Update Scam
Aadhaar Update ScameSakal
Updated on

आधार कार्ड आज एक अत्यावश्यक असं डॉक्युमेंट झालं आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा सुलभरित्या लाभ घेण्यासाठी हे भरपूर आवश्यक आहेत. आपलं आधार कार्ड हे वेळोवेळी अपडेट करून घेण्याच्या सूचना केंद्र सरकार देत असतं. आता याबाबत एक गंभीर इशारा नागरिकांना देण्यात आला आहे

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला असेल, तर सावधान होण्याची गरज आहे. कारण, फसवणूकीचा हा एक नवीन प्रकार असल्याचं दिसून आलं आहे.

Aadhaar Update Scam
Uidai Website : आधार, पॅन कार्ड हरवलंय? चिंता करण्याची गरज नाही,असं मिळवा मोफत!

'UIDAI'चा इशारा

यूआयडीएआयने आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. UIDAI आधार अपडेट करण्यासाठी कधीही ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कागदपत्रं मागवत नसल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

त्यामुळे अशा प्रकारे कोणी कागदपत्रांची मागणी केल्यास, आपले डॉक्युमेंट्स त्यांना पाठवू नका; असं या पोस्टमध्ये सांगितलं आहे. असं केल्यास तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधार अपडेट करण्यासाठी केवळ अधिकृत मार्गांचाच वापर करा, असंही सांगण्यात आलं आहे.

Aadhaar Update Scam
Free Aadhaar Update : आधार अपडेट न करणाऱ्यांना मोठा दिलासा! सरकारने दिले तीन महिने मुदतवाढ

असं करा अपडेट

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही My Aadhaar Portal चा वापर करू शकता. तसंच, नजीकच्या आधार केंद्रावर जाऊनही तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आधार अपडेट करून घेऊ शकता. केवळ आधारच्या अधिकृत वेबसाईटवरच डॉक्युमेंट्स अपलोड करावेत; असं यूआयडीएआयने स्पष्ट केलं आहे.

Aadhaar Update Scam
Aadhar Card Update Online : आता घरबसल्या करा आधार अपडेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.