Unintentional Weight Loss : पोटभर जेऊनही सतत भूक लागतेय, वजनही झपाट्याने कमी होतंय असं का?

कितीही खाल्लं तरी वजन वाढेना?
Unintentional Weight Loss
Unintentional Weight Lossesakal
Updated on

Unintentional Weight Loss :  आपण सहज बोलताना एखाद्याला म्हणतो की, काय तु किती खातोय तरी अंगाला लागेना, कसलं टेंशन घेतलंय एवढं. खरंच आपण खाल्लेलं का बरं आपल्या अंगाला लागत नाही. कितीही खाल्लं तरी वजन किती झटपट कमी होतंय.

काहीवेळा तुम्हाला असं जाणवंत असेल की तुमचं पोटभर जेवण झालं तरी तुम्हाला भूक लागते. काही लोकांना तर जेवण, नाश्ता वेळेत करूनही सतत पोटातून भुक लागली असा आवाज येतो, मग आपण काहीतरी खाल्ल पाहिजे म्हणून मिळेल ते खात सुटतो. पण, याचा आपल्या आरोग्यावर वाईटच परिणाम होतो.

आपलं वजन वाढायच्या ऐवजी कमीच व्हायला लागतं. सतत खाणाऱ्या लोकांच वजन वाढत असेल तर ते योग्य आहे. पण, सतत खात राहूनही वजन कमी झालं तर मात्र चिंतेची बाब असू शकते. कसं ते पाहुयात. (Unintentional Weight Loss : Are you getting dry even after eating a full stomach? Know why this weight loss has started happening suddenly)  

होय, जेव्हा शरीरात गंभीर आजार होतो तेव्हा शरीर अन्नातून बाहेर पडणारे पोषक शोषून घेणे थांबवते. यामुळे, असे घडते की आपण आपले नियमित अन्न खातो. परंतु शरीराला ते लागत नाही.

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही जेवण व्यवस्थित असूनही तुमचे वजन अचानक कमी होत. तुम्ही बारीक होत आहात तर हे या आजारांमुळे देखील असू शकते. (Health Tips)

अचानक वजन कमी होण्याची 4 गंभीर कारणे

हायपरथायरॉईडीझम

जेव्हा थायरॉईड ग्रंथी खूप जास्त थायरॉईड संप्रेरक बनवते तेव्हा हायपरथायरॉईडीझम होतो. या स्थितीला ओव्हरएक्टिव्ह थायरॉईड असेही म्हणतात. हायपरथायरॉईडीझममुळे शरीरातील पचनक्षमता गती वाढते.

याचा अर्थ तुमचे शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी बर्न करू लागते. यामुळे वजन कमी होऊ शकते. म्हणूनच जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर डॉक्टरांकडे जा आणि टेस्ट करून घ्या.

मधुमेह

मधुमेह असलेल्या लोकांमध्ये शरीराला लागणारी ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी रक्तातील ग्लुकोज शरीराच्या पेशींमध्ये येण्यापासून अपुरे इन्सुलिन प्रतिबंधित करते. जेव्हा असे होते, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी चरबी आणि स्नायू बर्न करू लागते, ज्यामुळे शरीराचे वजन वेगाने कमी होते. त्यामुळे तुम्ही पाहिलेच असेल की अनेक मधुमेही रुग्ण खूप पातळ असतात. (Digestion )

मानसिक रोग

नैराश्यमुळेही अचानक वजन कमी होऊ शकते. या काळात तुमची भूक आणि हार्मोनल आरोग्य इतके खराब होते की तुमचे वजन कमी होऊ लागते. तुम्ही खाल्ले तरी शरीराला अन्नातील पोषक तत्वे नीट शोषून घेता येत नाहीत.  

एखादं टेंन्शन असेल किंवा टेंशन येत असेल तर लोकांनी खाल्लेलं अन्न त्यांना शरीराला लागत नाही. कोणतंही टेंशन असेल तर झोप येत नाही, त्यामुळे चिडचिड होणे असे आजार सुरू होतात. (Healthy Food)

पचनसंस्थेतील बिघाड

सीलिएक रोग Celiac Disease मुळेही जलद वजन कमी होऊ शकते. सेलियाक रोग हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. ज्यामध्ये गहू आणि आट्यापासून बनवलेले पदार्थ पाहताच शरीर स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही.

तर, दुसरे म्हणजे, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) च्या समस्येमध्ये तुमच्या पचनावर इतका परिणाम होतो की तुम्ही जे काही खाता ते शरीराला नीट पचवता येत नाही. त्यामुळे तुमचे वजन कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.