Nirmala Sitharaman : अर्थसंकल्पाच्या दिवशी निळ्या साडीमध्ये दिसल्या अर्थमंत्री; प्रत्येक वेळी बजेट सादर करतानाचा लुक आहे खास!

The Finance Minister was seen in a blue saree on the budget day; अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्री दिसल्या निळ्या रंगाच्या साडीत...
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSakal
Updated on

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आपला सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी वेगेवेगळे लूक केले आहे. 2024 च्या अर्थसंकल्पाच्या दिवशी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रिंटेड निळ्या रंगाची साडी नेसली आहे. आणि त्यासोबत त्यांनी सोनेरी रंगाची शालही घातली आहे.

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवसासाठी निळ्या रंगाची साडी निवडली आहे. अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी बहुतांश लोकांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे असतात, मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साडीनेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्यांनी 2019 मध्ये त्यांचा कार्यकाळ सुरू केला, तेव्हापासून त्या प्रत्येक बजेटमध्ये त्यांच्या खास लुकमुळे चर्चेत राहिल्या.

दरवर्षी बजेटमध्ये त्या हातमागाच्या साड्या नेसताना दिसल्या ज्यावरून त्यांचे साडीवरील प्रेम स्पष्टपणे दिसून येते. मॉडर्न प्रिंटेड साड्या नेसण्याऐवजी अर्थमंत्री या सुंदर हातमागाच्या साड्या नेसतात. अर्थसंकल्पाच्या दिवशी त्या जी साडी नेसतात त्याचे विशेष महत्त्व असते, चला तर जाणून घेऊया, गेल्या पाच वर्षांत निर्मला सीतारामन यांनी कोणत्या साडीत अर्थसंकल्प सादर केला आहे.

अर्थसंकल्प 2019

2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी तेव्हा चमकदार गुलाबी रंगाची साडी घातली होती ज्यात सोनेरी रंगाची बॉर्डर होती. मंगलगिरी असे या साडीचे नाव आहे. (Budget 2019)

अर्थसंकल्प 2020

2020 च्या अर्थसंकल्पासाठी निर्मला सीतारामन यांनी पिवळा रंग निवडला होता. या दिवशी त्यांनी मॅचिंग ब्लाउजसह पिवळ्या सिल्कची साडी नेसली होती. (Budget 2020)

अर्थसंकल्प 2021

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021 च्या अर्थसंकल्पासाठी लाल आणि ऑफ-व्हाइट पोचमपल्ली सिल्क साडीची निवड केली होती. या साडीसोबत त्यांनी साधा लाल रंगाचा ब्लाउज घातला होता. साडीची खासियत म्हणजे त्याची बॉर्डर ज्याच्या आजूबाजूला इकत पॅटर्नची डिझाइन होती. (Budget 2021)

अर्थसंकल्प 2022

अर्थसंकल्प 2022 साठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा लूक खूपच खास होता. या दिवशी हातमागावर विणलेल्या साडीत त्या संसदेत पोहोचल्या. या दिवशी त्यांनी गडद मरून रंगाची साडी परिधान केली होती ज्यावर चांदीच्या धाग्याचे वर्क होते. या साडीचे नाव बोमकाई आहे, ती प्रामुख्याने भारताच्या पूर्वेकडील राज्य ओडिशामध्ये बनविली जाते. (Budget 2022)

अर्थसंकल्प 2023

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 च्या अर्थसंकल्पासाठी लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीवर पारंपारिक पद्धतीने कसूती वर्क करण्यात आले होते. या साडीवर रथ, मोर आणि कमळाचे काम करण्यात आले होते. निर्मला सीतारामन यांच्या या सिल्क साडीचे वजन 800 ग्रॅम होते जे धारवाडच्या 'अराठी क्राफ्ट्स'ने डिझाइन केले होते. (Budget 2023)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.