Unique Marathi Baby Girl : जेव्हा जोडप्याला बाळाची चाहुल लागते तेव्हाच त्या बाळासाठी नावं ठरवली जातात. मुलगा असेल तर हे नाव आणि मुलगी असेल तर ते नावं असं ठरवलं जातं. पण जेव्हा खरंच बाळाचं नाव ठेवण्याची वेळ जवळ येते तेव्हा त्यातील नाव फायनल झालेलं नसतं.
अशावेळी मग कोणीही सांगितलेले अर्थ नसलेलं नाव बाळासाठी निवडलं जातं. तुम्हालाही तुमच्या मुलीसाठी स्पेशल नाव ठेवायचं असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
खरंतर अ हे अक्षर म्हणजे एखाद्या चांगल्या प्रसंगाची सुरूवात होय. अ नेच बाराखडीची सुरूवात होते. तर, अ या शब्दानेच आदिशक्ती, आदिमाया अंबाबाईचेही नाव सुरू होते. अ नेच आई, आजी आणि आत्या या तीन शब्दांची सुरूवात होते. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या आयुष्यात या तीन स्त्रीया महत्वाची भुमिका पार पाडतात.
त्यामुळेच अ या अक्षरावरून येणारं बाळाचं नाव हे शुभ आणि मांगल्याच प्रतिक आहे. त्यामुळेच तुम्हालाही तुमच्या राजकन्येचे नाव अ वरून ठेवायचं असेल तर ही लिस्ट नक्की चेक करा.
आदिता - कोणत्याही गोष्टीची सुरूवात, सुरू
अनुश्री - सुंदरता, सौंदर्य
अनुषा - सुंदर, सालस
आद्या - प्रथम, सर्वात पहिली, सुरूवात
अनामिका - करंगळीच्या आधीच्या बोटाचे नाव, नाव नसणारी
आश्लेषा - सत्तावीस नक्षत्रांपैकी एक
आप्ती - पूर्ती, इच्छापूर्ती, पूर्णत्व
आरोही- स्वरातील चढता क्रम
आशका - गोड, गोडवा
अर्जिता - मिळवलेली, प्राप्त केलेली
अन्वेष्ठा - आरोग्य, शिक्षा
अन्वेषी- विनियम
अहाना- अंतर्मनातील प्रकाश
अनुज्ञा- परवानगी
अवनिता - पृथ्वी, पृथ्वीचे एक नाव
- नावातील तोचतोचपणा हल्ली कोणालाही नकोसा वाटतो. अ आद्याक्षरावरून मुलीचे नाव ठेवताना तुम्हाला त्यात रॉयलपणा हवा असेल तर तुम्ही ही नावे नक्की वाचा. अ वरून मुलींची रॉयल मराठी नावे आम्ही तुम्हाला इथे अर्थासह देत आहोत.
अरूणी- पहाट, पहाटेची वेळ
अस्मिता- अभिमान, स्वाभिमान जपणे
अभिरूपा- सौंदर्यवती, सौंदर्य असणारी मुलगी
अवनी- पृथ्वीचे एक नाव
अनीमा - शक्ती
अवनिजा- पार्वती देवी, पार्वतीचे एक नाव, देवी
आध्या - सर्वप्रथम
आराध्या - दैवत, प्रथम दैवत, प्रथम पूजलेले
अकिरा - कृपाळू, समर्थ
अभिधा - अर्थपूर्ण अशी
अभिध्या - शुभेच्छा, चांगल्या इच्छा
अभिजना - स्मरण
अमारा - गवत, अमर असणारी व्यक्ती
अमिथी - अपार
अमोदा - आनंद देणारी
अमृषा- अचानक, अनाहूत
अवना- तृप्त करणारी मुलगी
अभिती- प्रकाश, वैभव, संपत्ती
अंचिता- आदरणीय असणारी व्यक्ती
अमूल्या- अनमोल असणारी व्यक्ती
अरूणिका- पहाटेचा प्रकाश, तांबडा प्रकाश
अनिशा- अखंडित
असिमा - अमर्याद
अभ्यर्थना - प्रार्थना
अभिनीती - शांत, क्षमाशील, दयावान
अनसूया - बडबडी, ऋषीची पत्नी
अंजना - हनुमानाच्या आईचे नाव
अनिला - वारा
अविना- अडथळ्यांशिवाय जाणारी
अचिरा- खूप लहान
अधरा- मुक्त अशी
अधीती - विद्वान, हुशार
आर्यना - उदात्त मुलगी
अश्मिता - कठोर, सामर्थ्यवान असणारी, खडकाप्रमाणे
अनुला - कोमल अशी व्यक्ती
अमुक्ता - मुक्तपणे, स्वच्छंदी, मौल्यवान
अद्विती - तुलनेशिवाय, कोणाशीही तुलना नसलेली
अश्मा - पूर्वीच्या काळातील, अश्मयुगीन
अंबा - दुर्गामातेचे नाव, काशी राजाची मुलगी
अंशी - देवाची भेट, एखाद्याचा अंश
आर्वी - शुद्ध, शांतता
आर्ची - प्रकाश, सूर्याचे किरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.