कोल्हापूर : उन्हाळ्याच्या दिवसात कडक ऊन, घाम, गरम हवा या कारणांमुळे त्वचेला साईड इफेक्ट्स होऊ शकतात. ती कोरडी दिसायला लागते. यामुळे शरीरासोबत त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी काही सीझनल फळांचा उपयोग करून घेऊ शकता. ही फळे खाण्यासोबत तुम्ही चेहर्यासाठीही याचा वापरू शकता. साधारणतः या हंगामात स्ट्रॉबेरी, कलिंगड, आंबा ही फळे असतात. ज्यांचा वापर तुम्ही त्वचेचा फेसपॅक म्हणूनही करू शकता. परंतु यामधील कलिंगड हे एक असे फळ आहे, जे खाण्यासोबत तुम्ही त्याचा वापर चेहऱ्याच्या फेशियलसाठीही करू शकता. कलिंगड तुम्हाला बाजारांमध्ये मिळतात. परंतु आम्ही तुम्हाला पैसे खर्च न करता कलिंगडपासून जेल कसे बनवावे याची सोपी पद्धत सांगणार आहोत. तुम्ही याला स्टोअरही ठेवू शकता.
सुरुवातीला कलिंगडाच्या बिया वेगळ्या करून त्याचा ज्यूस करून घ्या. हा ज्यूस करण्यासाठी तुम्ही मिक्सर, ग्राइंडरचा वापर शकता किंवा हातानेही करू शकता. तयार झालेला रस तुम्ही एका बाउलमध्ये ठेवू शकता. आता त्यामध्ये तुम्ही एलोवेरा जेल मिक्स करा. यानंतर विटामिन ऑइल त्यामध्ये घाला. यानंतर खीराचा रस घाला आणि हे मिश्रण एकत्र करा. तुम्हाला दिसेल की या जेलचा कलर लाल होईल. या जेलला तुम्ही पाच दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि रात्री झोपण्यापूर्वी याचा फेशियलप्रमाणे चेहऱ्यासाठी पाच मिनिटे मसाज करू शकता. याचा तुम्ही उपयोग ओवरनाईट पॅक म्हणूनही करू शकता.
टरबुजाचे फायदे -
उन्हाळ्याच्या दिवसात गरम हवा त्वचेसाठी योग्य नसते. यामध्ये तुम्ही त्वचेला तजेलदार ठेवणार असाल तर तुम्हाला कलिंगड जेल नक्की वापरावच लागेल.
यामध्ये खूप न्युट्रीयंन्टस् असतात जे त्वचेला स्मुथिंग आणि कुल बनवण्यासाठी उपयोगी पडतात. चेहऱ्याला टरबुजाचे जेल लावल्याने त्वचा हायड्रेट होते.
जर उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा तेलकट होत असेल तर तुम्हाला कलिंगडच्या जेलचा वापर करावा लागेल. त्वचेतील जास्तीचे तेलकटपणा काढून टाकण्याचे काम हे करतात. तसेच चेहऱ्यावरील डेड स्किन कमी करण्यासाठी याची मदत होते.
कलिंगडमध्ये लाईकोपीन नावाचे एक अँटिऑक्सिडंट असते. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपलची समस्या असेल तर या दिवसांत येणाऱ्या घामामुळे त्याचे रूपांतर रैशमध्ये होऊ शकते. परंतु या जेलमुळे या समस्येंपासून सुटकारा मिळू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.