Valentine Day 2024 : ‘फेसबुकवर ओळख झाली अन् महिन्याभरातच लग्न झालं, लग्नानंतर आमचं प्रेम फुललं’

'माझ्या नवऱ्याने माझे रक्ताळलेले कपडे धुतले, जेवण बनवून मला घास भरवला'
Valentine Day 2024
Valentine Day 2024 esakal
Updated on

Valentine Day 2024 :

एक सर्वसामान्य जोडपं होतं. भेटले बोलले प्रेमात पडले आणि नंतर लग्न केलं. ही सर्वसामान्य असलेली लव्ह स्टोरी आहे. पण, आज आपण जी लव्ह स्टोरी पाहणार आहोत ती आहे लग्नानंतर सुरू झालेल्या प्रेमाची. त्याचं झालं असं की कोल्हापुरातल्या कळंब्यात राहणाऱ्या मधुवंतीला सचिनने लग्नाची मागणी घातली. तेव्हा मधुवंतीनेही होकार दिला आणि लगेचच लग्नाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्याला कारणही तसंच होतं.

साधारण ८-९ वर्षांपुर्वीच्या १० मार्चचा तो दिवस होता. त्या दिवशी मधुवंतीला फेसबुकवर एक रिक्वेस्ट आली. सचिन सुतार असं त्याचं नाव होतं. सचिन पेशाने इंजिनिअर होता. त्याचं स्वत:च घर होतं. तो पायावर उभा होता.

अशा या सचिनने पाठवलेला संदेश पहायला मधुवंतीने चक्क १०-१२ दिवस घेतले. संदेश पाहुन त्यांचे बोलणे सुरू झाले. अन् दोन ते तीन दिवसांच्या बोलण्यातच सचिनने मधुवंतीला लग्नासाठी मागणी घातली.

Valentine Day 2024
Valentine Day 2024 : ‘गिटार वादकाशी लग्न करण्यासाठी मी घरच्यांच्या होकाराची १० वर्ष वाट पाहिली’

मधुवंती दिसायला देखणी होती. पण नुकतेच वडिलांचे निधन झाले होते. ती आई आणि भाऊ असे तिघेच घरी राहत होते. तेव्हा मधुची बारावी झाली होती. पुढील शिक्षण बाकी होतं. अशा काळात सचिनने मागणी घातली.

दोघांची जात एकच असल्याने त्यांच्या घरच्यांनीही अडवलं नाही. मधुच्या आईने यासाठी तिला पाठिंबा दिला. मुलगा शिकलेला अन् आपल्याच जातीचा आहे तर होकार सांग, असा समजुतीचा सल्ला आईने मधुला दिला.

तेव्हा मधुने सचिनला होकार दिला. त्यानंतर त्या दोघांच्याही घरी बैठक झाली, पाहण्याचा कार्यक्रम उरकला अन् केवळ एका महिन्यात म्हणजेच १० एप्रिलला तिचं लग्न झालं. खरं प्रेम आणि नातं सुरू झालं ते लग्नानंतरच. त्यांनी या नात्यात अधिक वेळ घेतला असता तर कदाचित तिला पुरेसा विचार करायलाही वेळ मिळाला नसता. पण तिने योग्य वेळेत निर्णय घेतला त्यामुळे हे नातं घट्ट निर्माण झालं असं ती म्हणते.

Valentine Day 2024
Valentine Day Celebration 2024 : लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात? मग असा साजरा करा 'व्हॅलेंटाइन्स डे'

लग्न होऊन सासरी म्हणजे पन्हाळ्याजवळील केर्ले गावात आली. तेव्हा ग्रामिण जीवन तिने स्विकारलं. ती एक उत्तम गृहिणी बनली. पण काही कारणाने ती आणि सचिन कळंब्यात आले तेव्हा तिच्या मिस्टरांनी नोकरी सोडून घरगुती व्यवसाय असलेले सुतार काम करण्याचा निर्णय घेतला. सध्या ते हाच व्यवसाय करतात. या कामात मधुही त्यांना मदत करते. आणि संसाराला हातभार म्हणून मधुही शिवाजी विद्यापीठात नोकरी करत होती.

या ९ वर्षांच्या संसारात मधु-सचिनला अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला. मध्यंतरीच्या काळात मधुला दिवस गेले पण काही कारणाने तिचा गर्भपात झाला. तेव्हा महिनाभर तिचे ब्लिडींग होत होते. एक आई मुलीसाठी करणार नाही इतकं सचिनने तिच्यासाठी केलं. माझ्या नवऱ्याने माझे रक्ताळलेले कपडे धुतले, जेवण बनवून मला घास भरवला हे सांगताना मधुच्या डोळ्यात पाणी आलं होतं. खरंच मित्रांनो प्रेम याहुन वेगळं काय असतं.

मधुवंती आणि सचिन
मधुवंती आणि सचिन
Valentine Day 2024
Valentine Day 2024 : लग्नाला दोन वर्ष होऊदेत किंवा पन्नास जोडीदाराला कधीच सांगू नका या गोष्टी, कारण...

मधु म्हणते, सुतार काम असल्याने काहीवेळा आर्थिक अडचणींचा सामनाही करावा लागतो. पण कधीच सचिन काही कमी पडू देत नाही. गर्भपातानंतर तिचं वजन अवाढव्य वाढलं होतं तेव्हा मी बारीक व्हावं, माझ्या मागे लागलेल्या गोळ्या कमी व्हाव्यात यासाठी सचिनने तिला जिमला जायला सांगितलं. अन् तिने वजन कमीही केलं. मधु थोडी बिंधास्त आहे. तिला हवं ते ती करते यात सचिन तिला कधीच अडवत नाही.

प्रेमविवाह केल्यानंतर काही वर्ष, किमान एक मुलं होईपर्यंत नवरा-बायकोचं गोड नातं टिकतं. त्यानंतर उरतो तो फक्त संसार. पण मधु आणि सचिनची गोष्टच जगावेगळी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.