Valentines Special पुण्यातील अंध व्यक्तीची डोळस प्रेम कहाणी!

सुरेख रुप व कुशाग्र बुध्दी असलेल्या राहुल देशमुख या अंध तरुणाची ही कहाणी. महाविद्यालयात असतानाच त्याच्या जीवनात देवता नावाची डोळस, सुंदर परी मैत्रिण म्हणून आली.
Rahul Deshmukh and Deavata
Rahul Deshmukh and DeavataSakal
Updated on
Summary

सुरेख रुप व कुशाग्र बुध्दी असलेल्या राहुल देशमुख या अंध तरुणाची ही कहाणी. महाविद्यालयात असतानाच त्याच्या जीवनात देवता नावाची डोळस, सुंदर परी मैत्रिण म्हणून आली.

सहकारनगर - तो सुस्वरुप, सुशिक्षित पण अंध (Blind) आणि ती एखाद्या परीसारखी (Angel) लोभस आणि डोळस देखील. त्याचे प्रेम (Love) यशस्वी (Success) होईल का? राहुल देशमुख (Rahul Deshmukh) या तरुणाची कहाणी (Story) काहीशी अशीच चित्रपटात शोभावी अशी पण प्रत्यक्षात घडलेली आहे.

सुरेख रुप व कुशाग्र बुध्दी असलेल्या राहुल देशमुख या अंध तरुणाची ही कहाणी. महाविद्यालयात असतानाच त्याच्या जीवनात देवता नावाची डोळस, सुंदर परी मैत्रिण म्हणून आली. आपली जवळीक इतरांना कळू नये यासाठी दोघेही पुरेपुर काळजी घेत होते. या प्रेमी युगुलांच्या भेटीगाठी कॉलेज सुरू व्हायच्या आधी म्हणजेच सकाळी सहा- सव्वासहाच्या सुमारास होत असत. व्हॅलेन्टाईन्स डे देखील हे दोघं इतर कुणाला कळू नये म्हणून व्हॅलेन्टाईन्स डेच्या एक दिवस आधी साजरा करत असत. देवतावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे पहिल्या व्हॅलेंटाईन्स डे ला राहुल ने तीलवा स्वामी विवेकानंदांचे पुस्तक भेट दिले तर देवताने त्याला रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांची कॅसेट भेट दिली.

राहुलच्या प्रगतीत अंधत्वाला अडथळा आणताच आला नाही. तो बारावीत पुणे बोर्डत तेरावा, बीएला पुणे विद्यापीठात चौथा तर एमएला समाजशास्र विषयात पुणे विद्यापीठात पहिला, एमए राज्यशास्त्र विषयात पुणे विद्यापीठात पाचवा, याशिवाय त्याने बीएड, एमएसडब्ल्यूचे ही शिक्षण घेतलेले. त्याची ही शैक्षणिक प्रगती डोळसांनाही लाजवणारी ठरली. राहुल आणि देवताचे नाते अधिकच फुलत गेले. इतके की दोघांनीही एकमेकाचे जीवन साथी होण्याचे ठरवले.

देवताने एमबीए फायनान्स चे शिक्षण पुर्ण करुन सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम मिळवले. तर राहुल बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून काम करतोय. त्याने नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (NAWPC) ही संस्था सुरु केली होती. बँकेतील कामामुळे हे काम कोण करणार असा प्रश्न पडला असतानाच देवताने स्वतःची नोकरी सोडत स्वतःकडे ती जबाबदारी घेतली.

Rahul Deshmukh and Deavata
Kiss Day : किस करताय? 'शास्त्र असतं ते!'

राहुलला पुण्यात राहण्यासाठी स्वतःचं घर नव्हतं. लग्न करायचं असेल तर घर असायला पाहिजे म्हणून त्याचे मामा श्याम दंडवते यांनी त्याच्यासाठी पुण्यात घर घेतलं. राहुलला देवता बरोबर लग्न करायचे होते परंतु आपल्या डोळस मुलीने अंध तरुणाशी विवाह करावा हे तीच्या घरच्यांना पसंत नव्हते. मात्र प्रयत्नपूर्वक अखेरीस देवताने आई-वडिलांची लग्नाला परवानगी मिळवली पण तिच्या दोन्ही भावांचा मात्र या लग्नासाठी विरोध राहिला. या कठीण प्रसंगी सिक्कीमचे तेव्हाचे राज्यपाल श्रीनिवास पाटील या प्रेमीयुगुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनीच लग्नासाठी मंगल कार्यालय देखील त्यांना शोधून दिलं.

या दोघांच्या लग्नाची बातमी जेव्हा त्यांच्या संस्थेतील नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांना समजली तेव्हा एकच जल्लोष झाला. संस्थेच्या स्वयंसेवकांनी या विवाह सोहळ्याची सगळी जबाबदारी स्वीकारली. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव, ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू अशी व्हीआयपी मंडळी आशिर्वाद द्यायला उपस्थित होते. लग्न झोकात लागले. अंध आणि डोळसांच्या मिलाफावेळी समस्त्यांच्या डोळ्यातून जे आनंद अश्रू वहात होते ते पुसायला त्यावेळी हात सुध्दा नको म्हणत होते.

एखादी गोष्ट मनापासून मागितली तर ती मिळवण्यासाठी कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. सर्व दृश्य अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभ्या राहतात आणि तुम्हाला यशस्वीतेच्या शिखरावर नेवून ठेवतात. हे प्रत्यक्षात घडले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()