OK Kanmani : 'लिव्ह इन रिलेशनशिप'चा असा शेवट होणार असेल तर...

OK_Kanmani
OK_Kanmani
Updated on

Valentines Day Special: OK Kanmani: पुणे : व्हिडिओ गेम डेव्हलपर असणाऱ्या आदित्य (दुलकर सलमान) आणि आर्किटेक्ट तारा (निथ्या मेनन) यांची ही गोष्ट. रेल्वे स्टेशनवर एकमेकांना पाहिल्यानंतर पुन्हा एका मैत्रिणीच्या लग्नात या दोघांची भेट होते. काही दिवसात आदित्य आणि तारा एकमेकांचे चांगले मित्र होतात, आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण लग्न करण्याआधी ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. आदित्य हा गणपती अंकल (प्रकाश राज) आणि भवानी आँटी (लीला सॅमसन) यांच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत असतो. यासाठी गणपती आणि भवानी यांना गळ घालून परवानगीही मिळवतात. आणि मग पुढे काय काय होत जाते, ते चित्रपटात पाहणं सोईस्कर. 

लिव्ह इन रिलेशनशिप आणि दोन पिढ्यांमध्ये प्रेम करण्याच्या स्टाईलमध्ये असलेला फरक याचं चित्रण ओके कन्मनीमध्ये करण्यात आलं आहे. आदित्य-तारा ही तरुणपिढी आणि गणपती-भवानी ही त्यांच्या अगोदरची पिढी या दोन्हींमधील प्रेमाची भावना दिग्दर्शकानं अतिशय सुंदररित्या मांडली आहे. लग्न, आपली मूल्ये आणि परंपरा यांचा मेळ घालण्यात सध्याच्या पिढीला येणाऱ्या अडचणींचं प्रतिबिंब या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. भवानी ही अल्झायमरने ग्रस्त असल्याने तिची काळजी घेणारा गणपती आणि या दोघांमधील प्रेम आदित्य-ताराच्या मनावर खूप खोलवर परिणाम करतं. लीला आणि प्रकाश राज यांनी सहकलाकारांची भूमिका साकारली असली तरी तीदेखील तितकीच महत्त्वाची ठरते.

आदित्य आणि तारा हे दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असल्याने त्यांची स्वप्नही वेगळी असतात. आदित्यला पुढे यूएसला तर ताराला पुढे पॅरिसला जायचं असतं. पण एका दिवशी अचानक भवानी आँटी हरवते. तिला शोधत असताना आदित्य आणि तारा हे त्यांच्यामध्ये असलेल्या नात्याला घेऊन वाद घालत असतात. शेवटी आदित्य ताराला प्रपोज करतो आणि ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. आणि लग्नानंतर आपापली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदित्य यूएसला आणि तारा पॅरिसला निघून जाते. 

ओके कन्मनीचं बरचसं शूटिंग हे मुंबईमध्ये झालं आहे. आण पी.सी.श्रीराम यांच्या सिनेमॅटोग्राफीनं कमाल केली आहे. मुंबईत अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसातील सीन चित्रपटात शूट केले असून ते घरबसल्या तुम्हाला पावसात भिजल्याचा आनंद देतील. चित्रपटातील एकही सीन तुम्हाला रटाळवाणा वाटत नाही, याचं सगळं श्रेय सिनेमॅटोग्राफर (श्रीराम) आणि इडिटर (ए. श्रीकर प्रसाद) यांना जातं.

साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या मणिरत्नम यांनी तीन पिढ्यांचं मनोरंजन केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नव्वदच्या दशकातील रोजा (अरविंद स्वामी, मधू) पासून त्यांच्या हिट चित्रपटांची सुरवात झाली. नंतर नायक, बॉम्बे, दिल से असे एकाहून एक सुपरहिट चित्रपट त्यांनी केले. आताच्या पिढीला डोळ्यासमोर ठेवत लिव्ह इन रिलेशनशिप ते लाँग डिस्टन्स रिलेशनशिप या विषयावर आधारित ओके कन्मनी हा चित्रपट बनवला आणि तो सर्वांच्या पसंतीस उतरला. 

दुसरी गोष्ट म्हणजे मणिरत्नम आणि ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर.रहमान ही जोडी जमली की हमखास चांगली म्युझिक ट्रीटची गॅरंटी मिळणार हे नक्की. या जोडीने मिळून ज्या-ज्या चित्रपटांसाठी काम केलं आहे, ते चित्रपट तर हिट झालेच शिवाय त्यामधील गाणीही तितकीच हिट झाली. ओके कन्मनीमधील सर्वच गाणी हिट आहेत. 

१७ एप्रिल २०१५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचं बजेट होतं ६ कोटी रुपये आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ४५ कोटींहून अधिक गल्ला जमवला. या चित्रपटाला क्रिटिक्सनीही चांगले रिव्हिव्यू दिले आहेत. मूळ तमिळ असणाऱ्या या चित्रपटाचे तेलुगू (ओके बंगारम), मल्याळम (ओके कन्मनी) आणि हिंदीमध्ये (ओके जानू) रिमेक करण्यात आले आहेत. हिंदीतील ओके जानूमध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी दिसली होती, पण ओके जानू बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करू शकला नाही. आदित्य-श्रद्धा यांना दुलकर-निथ्या या जोडीने केलेली जादू करता आली नाही. शेवटी काय तर ओरिजिनल ते ओरिजिनलच.

(व्हिडिओ सौजन्य: YouTube)

- व्हॅलेंटाइन स्पेशल आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.