फेब्रुवारी महिन्यात सुरू होणारा व्हॅलेंटाईन वीक कपल्स वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. व्हॅलेंटाईन डे वीक 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत असतो. हा संपूर्ण आठवडा कपल्ससाठी खूप खास आहे. कपल्स त्यांच्या मनातील भावना एकमेकांना शेअर करतात. आज आम्ही तुम्हाला कोणत्या दिवशी काय साजरं केलं जाणार आहे याबाबत अधिक माहिती देणार आहोत.
व्हॅलेंटाईन डे वीक 7 फेब्रुवारी म्हणजेच रोज डे पासून सुरू होतो. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना गुलाबाचे फूल देऊन प्रेम आणि काळजी व्यक्त करू शकता. गुलाब ही प्रेमाची सुरुवात मानली जाते. या दिवशी जोडपे आपल्या जोडीदाराला वेगवेगळ्या रंगाचे गुलाब देतात. (Rose Day - 7th February 2024)
8 फेब्रुवारी रोजी प्रपोज डे साजरा केला जातो. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट सांगण्यासाठी हा दिवस उत्तम ठरतो. प्रपोज करताना तुम्ही केक, फुलं, एखादी रिंग किंवा त्या व्यक्तीची आवडती वस्तू देऊ शकता. (Propose day - 8th February 2024)
व्हॅलेंटाईन डे चा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. हा दिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना चॉकलेट देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. चॉकलेटचा गोडवा नात्यात गोडवा वाढवतो. (Chocolate Day - 9th February 2024)
व्हॅलेंटाईन डे चा चौथा दिवस म्हणजेच टेडी डे 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी, कपल्स एकमेकांना टेडी बियर गिफ्ट करतात. वेगवेगळ्या रंगांच्या टेडीजचेही वेगवेगळे अर्थ आहेत. (Teddy Day - 10th February 2024)
11 फेब्रुवारी रोजी प्रॉमिस डे साजरा केला जातो. या दिवशी, तुम्ही तुमच्या जोडीदाराला सदैव तुमच्यासोबत राहण्याचे, त्यांना आनंदी ठेवण्याचे आणि बरेच काही वचन देऊ शकता. (Promise Day - 11th February 2024)
12 फेब्रुवारीला हग डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपे आपल्या जोडीदाराला मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात. अनेकदा लोक एकमेकांना मिठी मारून आपल्या भावना व्यक्त करतात. (hug day - 12th February 2024)
13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. या दिवशी आपल्या पार्टनरसोबत असलेले नातेसंबंध मजबूत बनवण्याचा दिवस मानला जातो. (kiss day - 13th February 2024)
हा दिवस 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस जोडप्यांसाठी खूप खास असतो. बहुतांश जोडपी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत चांगला वेळ घालवू शकता. (Valentine's Day - 14th February 2024)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.