Valentine Week : जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणारा व्हॅलेंटाइन डे यंदा विक डेजमध्ये आला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच सुट्टीचा प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे अशा सगळ्या बिझी शेड्युलमध्येही जर तुम्हाला व्हॅलेंटाइन डे प्लॅन करायचा असेल तर काही ट्रिक्स तुम्ही यूज करू शकतात. ऑफीसमधून सुट्टी काढून पार्टनरसोबत पुर्ण दिवस घालावता नाही आला तरी या सोप्या उपायांनी व्हॅलेंटाइन डे साजरा मात्र नक्की करू शकाल. कसा जाणून घ्या.
हाफ डे
जर पुर्ण दिवसाची सुट्टी मिळत नाही तर किमान हाफ डे घ्या. लवकर लवकर काम संपवा म्हणजे हाफ डे कँसल होणार नाही. बॉसला कामा संदर्भात तक्रार करण्याची संधी देऊ नका. त्यामुळे ऑफीसला पोहचल्या बरोबर वेळ वाया न घालवता काम संपवा आणि दिवस संपायच्या आता पार्टनरसोबत वेळ घालवा.
नाईट डेट
जर ऑफीसमधून सुट्टी नाही मिळाली किंवा हाफ डे पण नाही मिळाला तर नाईट डेट तुम्ही प्लॅन करू शकतात. एखादी रोमँटिक मुव्ही बघू शकतात नाहीतर छान कँडल लाइट डिनरसाठी जाऊ शकतात.
लंच डेट
जर डिनर डेट जमणार नसेल तर लंच डेट प्लॅन करा. जोडिदाराच्या ऑफीस जवळच्या ठिकाणी लंच डेट प्लॅन करा. किंवा स्वतःच्या ऑफिसजवळ बोलवून घ्या. एकत्र लंच करा. एकमेकांच्या आवडचे पदार्थ आवर्जून घेऊन जा किंवा ऑर्डर करा आणि तास, दोन तास आनंदाने सोबत घालवा.
सरप्राइज
व्हॅलेंटाइन डे ला सगळ्यांना भेटावसं तर वाटत असतंच. पण जर काही कारणाने किंवा सुट्टी न मिळाल्याने दिवस साजरा करता येत नसेल तर काही वेगळा प्लॅन करणे आवश्यक आहे. यासाठी ऑफीसला जाताना सोबत निघा. पिक आणि ड्रॉप सोबत घेऊ शकतात. जर तुम्ही एकमेकांपासून लांब असाल तर व्हिडीओ कॉल करा, एकमेकांना गिफ्ट पाठवत रहा आणि सरप्राइज करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.