प्रेमाची व्याख्या अनुभवाबरोबर बदलत जाते असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण काही YZ मध्ये मोडणारी मंडळी हे मान्य करायला तयार नसतात. प्रेमाच्या परिभाषेचं त्यांनी एक वेगळं जग बनवलेलं असतं आणि विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ते आपल्या विचाराला बदलायला तयार नसतात. त्यांच्या या वृत्तीमुळे दुसऱ्यावर काय परिणाम होईल याचा त्यांना विसर पडतो. आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रत्येकाच मत इथं वेगळं असतं. यापद्धतीने ते आय़ुष्य जगण्याचा निर्णय घेतात. शाम्या त्याच YZ मधला.....
प्रेम या भावनेत आयुष्याला कलाटणी देण्याची ताकद असते हे मान्य करायला माझी काहींच हरकत नाही. पण समोरच्याच्या मनात तुमच्याविषयी प्रेमाची भावनाच निर्माण झाली नसेल तर तुम्ही आयुष्य त्या प्रेमाच्या नावावर केल्यास कदाचित तो वेडेपणा ठरेल, असंही कुठतरी वाटतं. ही गोष्ट मी शाम्याला गेल्या काही दिवसांपासून समजावण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याला मात्र माझ्या वास्तविक विचारापेक्षा त्याच्या तत्वांवर अधिक विश्वास आहे. त्याला समोरच्या व्यक्तिच्या भावनेबद्दल काही पडलेल नाही. त्याच ठाम मतं आहे. तिनं काय करावं हे माझ्या हातात नाही, पण मी काय करावं हे मला कुणी सांगण्याची गरज नाही. शाम्या काय करणार आहे देव जाणं आणि त्याचं ते प्रेमं जाणं. पण हा असा प्रवास करणं सोप नाही हे मात्र नक्की.
Chocolate Day: चॉकलेटच्या जन्माची कहाणी
पहिलं प्रेम माणूस कधी विसरत नाही असं मी एकलं आहे. पण शाम्या त्याला अपवाद होता आणि प्रेमाची पहिली आणि दुसरी अशी वर्गवारी करता येऊ शकत नाही. असंच काहीसं समीकरण मला पाहायला मिळत होतं.
शाम्यानं कॉलेजला दाखला घेतला तेव्हाच त्याचं सातवर्षाचं प्रेम ब्रेकअपच्या उंबरठ्यावर आलं होत. यात त्याची काहीच चूक नव्हती. म्हणजे त्यानं थोडा जोर लावला असता तर त्याला ते सहज मिळवता आलं असतं. पण त्याच्या तत्वांनी त्याचा घात केला. तिला वाटतंय ना मग ठिक आहे. या एका वाक्याने सातवर्षांचं प्रेमाची माती झाली. तो प्रत्येकवेळी तिचा विचार करत राहिला आणि ती बघता बघता त्याला सोडून निघून गेली. यातून तो सावरत असताना काव्या नावाची नवी मुलगी त्याच्या आयुष्यात आली.
नवं कॉलेज नवी माणसं या वातावरणात एका क्षणात काव्या शाम्याच्या मनात घर करुन गेली. पोरीच्या अंगी असणारी जिद्द त्याला खूप आवडायची. ती त्याला काव्यामध्ये दिसली आणि तो दुसऱ्यांदा प्रेमात पडला. प्रेम ही व्यक्त करण्याची गोष्ट नाही तर ती अनुभवण्याची गोष्ट आहे. त्या व्यक्तिच्या आनंदात आपला आनंद आहे. या तत्वानं काव्याच्या प्रेमात तो हळूहळू घसरत गेला.
फॅशनच्या नावाखाली काहीही? छिद्रेवाला स्वेटरची किंमत वाचून व्हाल थक्क
शाम्या तिच्या प्रेमात गुरफट गेल्याची गोष्ट फारच रोमहर्षक आणि फार कमी प्रेमवीरांच्या बाबतीत ऐकायला मिळते. एका ट्युशनच्या क्लासमध्ये काव्या आणि शाम्याची भेट झाली. त्या वर्गात शिकवायला येणारा अवलिया प्राध्यापक लेक्चरवेळी फारच मोठं बोलायचा. सब मोह माया है! या वाक्याचे कॉपी राइट आपल्याकडे असल्याच्या अविर्भावत तो अनेकदा हे वाक्य वापरायचा. क्लासमध्ये इनमिन चार पोरी आणि दहा-बारा पोरं. काव्या त्यातीलच एक.
पटेली (बढाया) मारणाऱ्या मास्तरनं एकदा काव्याला आपण सांगितलेलं उदाहरण बोर्डवर एक्सप्लेन करुन दाखव असं सांगितलं. मला जेवढं कळलंय तेवढ जागेवरुन सांगेन. पुढं येणार नाही. असा ठाम पवित्रा यावेळी काव्यानं घेतला होता.यावर त्या मास्तरनं तू पुढे येऊन एक्सप्लेन केल्याशिवाय नेक्स्ट स्टेप समजवणार नाही अशी धमकी वजा आदेश दिला. काव्या मात्र आपल्या मतावर ठाम होती. ती शेवटपर्यंत पुढे जाण्यास तयार झाली नाही. तिचा हा जिद्दी स्वभावानं शाम्या आश्चर्यचकित झाला.
त्यानं घरात येऊन फेसबुकवर काव्याला सर्च केलं. आणि तिला फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली.
दुसऱ्या दिवशी काव्यानं त्याला मला तू शोधलंस कसं? फेसबुकवर अनेकांना मी एवढ्या सहज सापडत नाही. असंही ती म्हणाली. यावर श्याम्यानं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
Valentine Week : मुलीला प्रपोज करायचंय? मग अशा टिप्स फॉलो कराच
शाम्याच्या फेसबुक फ्रेंड्समध्ये यापूर्वीपासून अनेक मेत्रीणी होत्या. पण फेसबुकवर सर्च करुन रिक्वेस्ट पाठवलेली काव्या ही एकमेव पहिली मैत्रीण होती. त्याला तिचा तो जिद्दी स्वभाव फारच भावला होता. शाम्याने काव्यासोबत मैत्री वाढवली. त्यांच्या दोघांचे सूर जूळत असल्याचं वाटू लागलं होतं. पण, प्रेमाचा प्रस्ताव ठेवणार तोच शाम्याला त्याच्या आयुष्यात कोणीतरी असल्याचे कळलं. शाम्यानं हे अगदी शांतपणे पचवलं. एवढचं नाही काव्या आणि तिच्या बॉयफ्रेन्डची प्रेम कहाणी ऐकण्यात त्याने आपल्या प्रेमाचा आनंद मानला. या गोष्टीबद्दल त्याची गिनती YZ म्हणून होण्यास सुरुवात झाली. पण त्याने तिची बाजू कधीच पडू दिली नाही. तिच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता वाट्टेल ते करण्याचं त्याला बळ कसं येत ही खरंच आश्चर्याची गोष्ट होती. पण तो पुन्हा तिच चूक करत होता. जी पहिल्या वेळी केली. त्याच्या हे लक्षात आलं.
शाम्याने एकदा मनातली गोष्ट एकदा तिला बोलून दाखवली. यावेळीही तिने आपल्याला होकार द्यावा ही भावना नव्हती. तर आपल्या मनातील भावना तिच्यापर्यंत पोहचावी एवढंच त्याला अभिप्रेत होतं.
Valentine Week Special: प्रेमाचा वाढदिवस...
आपण आयुष्यभरासाठी चांगले मित्र राहू शकतो पण एकत्र येणं शक्य नाही, हे त्याला कळलं होतं. पण तरीही त्याच्या प्रेमाची भावना कमी होत नव्हती. तिला लग्न मान्य नाही तर आपणही तोच विचार आत्मसात करण्याच खुळ त्याच्या डोक्यात भरलं. त्यानं आयुष्यात कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय YZ आहे, याची शाम्याला कल्पना होती. पण.. नाही म्हणजे नाही.
खरंतर असा विचार कोणत्याही प्रेमी युगलांनी करु नये पण एखाद्याच्या मनातील भावना बदलण्याचं यंत्र नसल्यामुळे ही भावनाही बदलता येत नाही. आता पुढं काय होणार? ती आयुष्यात आली नाही. योगायोगानं 13 जुलै अर्थात 13/7 ही तिची प्रत्येक्षात भेटीची शेवटची तारीख. ही तारीख जेवढी लक्षात आहेत तेवढीच काव्याही त्याच्या लक्ष्यात आहे. अबोला असूनही तिचं शाम्याची मनातील स्थान अजिबात कमी झालेलं नाही. व्हॅलेंटाईन डे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.