'व्हॅलेंटाईन डे'च्या मागची खरी गोष्ट काय आहे?

जागतिक प्रेमदिवस हा एकप्रकारे प्रेमीयुगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमांसचा अनोखा सोहळाच आहे.
History of Valentine's Day
History of Valentine's Day esakal
Updated on
Summary

जागतिक प्रेमदिवस हा एकप्रकारे प्रेमीयुगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमांसचा अनोखा सोहळाच आहे. (History of Valentine's Day)

जगभर"व्हॅलेंटाईन डे" (Valentine's day) म्हणजेच जागतिक प्रेम दिवस हा 14 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. जागतिक प्रेमदिवस हा एकप्रकारे प्रेमीयुगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमांसचा अनोखा सोहळाच आहे. या दिवशी ऐकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको आपल्या, साथीदाराला प्रेमाची साद घालुन आकर्षक भेटवस्तू (Gifts)देतात तसेच प्रेमाचा सुरेख असा संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न करतात. पण हा सोहळा का आणि केव्हा पासून साजरा केला जातो अन् त्यामागची खरी गोष्ट काय आहे? हा प्रश्न बहुतेक जणांना पडतो. याचीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

History of Valentine's Day
सिंगल आहात! असा साजरा करु शकता व्हॅलेंटाईन डे

जागतिक प्रेमदिवसाच्या मागची खरी गोष्ट नेमकी काय आहे?

जागतिक प्रेमदिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे संत व्हॅलेंटाईन यांच्या नावाने साजरा केला जातो. संत व्हॅलेंटाईन यांच्या विषयी अनेक गोष्टी प्रचलित आहेत पण सर्वात लोकप्रिय कथा रोमन किंग क्लॉडियस आणि संत व्हॅलेंटाईन यांची आहे. रोमन किंग क्लॉडियसने याच्या काळात आपल्या सैनिकांना लग्न करण्यास मनाई केली होती, पण संत व्हॅलेंटाईनने अनेक सैनिकांना लग्नासाठी तयार केले आणि त्यांचे लग्न लावून दिले. आपण आपल्या सैनिकांसाठी केलाला आदेश पायदळी दुडवल्याचा रोमन किंगला राग आला आणि त्याने रागाच्या अहंकारात 14 फेब्रुवारी 269 रोजी संत व्हॅलेंटाईनला फाशीवर चढवलं. त्यापुर्वी 14 फेब्रुवारीला रोममध्ये ‘Lupercalia’ नावाचा उत्सव साजरा केला जायचा. या उत्सवात मुले बॉक्समधून मुलींच्या नावाच्या चिढी काढत असत. उत्सवा दरम्यान ही जोडपी प्रेयसी-प्रियकर बनून फिरत असत आणि कधी कधी ते लग्नबंधनात देखील बांधली जात अशी गोष्ट आहे. नंतर पुढे चर्चमध्ये हा दिवस ख्रिश्चन उत्सव म्हणून आणि संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यास सुरूवात झाली. आणि मग लोक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संत व्हॅलेंटाईन नावाचा वापर करू लागले.

History of Valentine's Day
Valentine Day Special : एकतर्फी प्रेमात पडलेल्याला  'व्हॅलेंटाईन डे' पडला महागात.. 

व्हॅलेंटाईन डे नक्की कोणासाठी असतो?

व्हॅलेंटाईन डे प्रियकर किंवा प्रियशी कुणा एकासाठी नसून हा दिवस दोघांसाठी असतो. हा दिवस दोघेही साजरा करू शकतात. तुमच्या मनातील व्हॅलेंटाईन कोणीही असू शकतं. त्या प्रत्येकासाठी हा आनंदाचा किंवा प्रेमाचा सोहळा मनातील प्रेमासाठी साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस तुम्ही आई-बाबा, भाऊ-बहिण, मित्रमैत्रीण कोणासाठीही साजरा करू शकता.

व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करतात?

आपण हा दिवस हाताने तयार केलीली वस्तू, मिठाई, गुलाब, रोमँटिक डेट, मित्रांसमवेत वेळ घालवून साजरा करू शकतो. आणि हा दिवस साजरा करण्याचे अजूनही बरेच मार्ग आहेत. आपण रोमँटिक डिनर किंवा लंचसाठी बाहेर जाऊ शकता किंवा कोणत्याही रोमँटिक ठिकाणी वेळ घालवू शकता. या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना आवडत्या भेटवस्तू किंवा एखादा गोड पदार्थ देऊन नात्यातील स्नेह वाढवू शकता. प्रियकर प्रियशी एखादं सुंदर रोपटं लावुन देखील प्रेम दिवस साजरा करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.