Valentines Day Perfect Gifts : उद्या व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे आणि या निमित्ताने सर्व जोडपी त्यांच्या जोडीदारासाठी एक परफेक्ट गिफ्ट शोधत आहेत. गीफ्ट देताना एक गोष्ट लक्षात ठेवीवी ती म्हणजे ते गीफ्ट असे असावे की, ते दिसायलाही स्टायलिश असेल आणि तुमचा पार्टनर रोज वापरू देखील शकेल. आज आपण 5000 रुपयांच्या खाली स्वस्त व्हॅलेंटाईन डे गिफ्ट काय असू शकतात याची यादी पाहाणार आहोत, जे तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेट देऊ शकता. म्हणजेच भेटवस्तू देखील उपयुक्त आहे आणि खिशावर ताण येणार नाही.
1. Fire-Boltt Talk
या स्मार्टवॉचमध्ये दोन गोष्टी सर्वात खास आहेत. पहिली म्हणजे ही स्मार्टवॉच गोल आकाराच्या डायलसह येते, जे तुम्हाला एक अनोखा लुक देईल. यासोबतच यात ब्लूटूथ कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच कंपनीच्या वेबसाइटवर 4,999 रुपयांना विकले जात आहे. याशिवाय यामध्ये Spo2 मॉनिटर, HR मॉनिटर, Sedentary Alerts सारखे फीचर्स देखील आहेत.
2. Realme Buds Air 2
वायरलेस इयरबड्स आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत. Realme चे 5000 च्या खाली अनेक वायरलेस इयरबड्स आहेत, त्यापैकी सर्वात स्टायलिश Realme Buds Air 2 हे आहे. त्यांची किंमत2,999 रुपये आहे. हे चार कलर ऑप्शन्समध्ये येते - हिरवा, सोनेरी, काळा आणि पांढरा. फीचर्सबद्गल बोलायचे तर, यामध्ये एक्टिव नॉईज कॅन्सलेशन, 25 तासांचा प्लेबॅक टाईम, कॉलिंगसाठी ड्युअल माइक आणि स्मार्ट डिटेक्शन सेन्सर यांचा समावेश आहे.
3. Tagg Revolve Wireless Speaker
Tagg च्या वायरलेस स्पीकरची किंमत 1799 रुपये आहे. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी, यात ब्लूटूथ v5.0 कनेक्टिव्हिटी दिली आहे, जी 10 मीटरची रेंज देते. यामध्ये पूर्णपणे स्टेबल आणि लॅगफ्री कनेक्टिव्हिटी मिळते त्यामुळे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय संगीताचा आनंद घेऊ शकता. हे IPX4 वॉटर रेजिस्टंट देखील आहे. त्यांना ट्रेंडी आणि पोर्टेबल डिझाइन देण्यात आले आहे. या स्पीकर्सना 1200mAh बॅटरी सपोर्ट दिला आहे, ज्यामुळे तुम्हाला 5 तासांचा प्लेबॅक टाईम मिळतो
4. Mi वायरलेस पॉवरबँक
सध्या पॉवरबँक देखील एक अत्यावश्यक ऍक्सेसरी बनली आहे आणि जर ती वायरलेस असेल तर अधिक चांगले ठरते . Xiaomi च्या या 10000 mAh वायरलेस पॉवर बँकेची किंमत 2,499 रुपये आहे. यात 2-वे फास्ट चार्जिंग, 10W वायरलेस चार्जिंग, 18W चार्जिंग आउटपुट आणि USB Type-C पोर्ट आहे. याच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी दोन डिव्हाईस चार्ज करू शकता.
5. UBON Neckband CL-3880
हे वायरलेस नेकबँड 3,599 रुपये किमतीचे असून ते 50 तासांच्या प्लेबॅक टाइमसह येतात. Ubon चे हे वायरलेस नेकबँड मॅग्नेटिक इंस्टंट कनेक्शन आणि हलके डिझाइनसह येतात. तसेच कॉल कनेक्टिव्हिटीसाठी यात इनबिल्ट माइक आहे. यात टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि ब्लूटूथ v5.0 कनेक्टिव्हिटी दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.