Valentine's Day : खरंच प्रेम आंधळं असतं? मानसतज्ज्ञ-समुपदेशकांचं काय आहे मत? जाणून घ्या..

प्रेम हा सामाजिक चिंतेचा विषय होणे चांगले नाही. मुली मोठ्या होण्याचे वय हे कमी होताना दिसते आहे.
Valentine's Day
Valentine's Dayesakal
Updated on
Summary

प्रेम (love) आणि आकर्षण या दोन वेगळ्या भावना आहेत. पहिला टप्पा अर्थातच आकर्षणाचा असतो. त्या टप्प्यात समोरील जी व्यक्ती आहे, तिचे दोष कितीही गंभीर असले, तरी त्याकडे दुर्लक्ष होते.

सांगली : प्रेम हा विषय निघाला की, त्याला आंधळेपणा जोडला जातो. ‘प्रेम आंधळं असतं’ असे का म्हणतात, त्याचे उत्तर सभोवती घडणाऱ्या अनेक प्रकरणांत दिसते, अनुभवाला येते. मग, प्रेम डोळस कसं होईल? आकर्षण आणि प्रेम यातील फरक कसा ओळखायचा, त्याचे भान कसे राखायचे, हे समजणे कठीण आहे... पण चर्चा तर झालीच पाहिजे. मानसतज्ज्ञ आणि समुपदेशक ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या (Valentine's Day) निमित्ताने त्याबद्दल सांगताहेत.

Valentine's Day
Valentines Day 2024 : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला दिसायचय छान? मग, ‘या’ पद्धतीने करा मेकअप, दिसाल ब्युटीफूल..!

आकर्षण व प्रेमात असते पुसट रेषा

प्रेम (love) आणि आकर्षण या दोन वेगळ्या भावना आहेत. पहिला टप्पा अर्थातच आकर्षणाचा असतो. त्या टप्प्यात समोरील जी व्यक्ती आहे, तिचे दोष कितीही गंभीर असले, तरी त्याकडे दुर्लक्ष होते किंवा त्याबद्दलही आकर्षण वाटू शकते. जेव्हा खरे प्रेम जडते, तेव्हा त्यात एकमेकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला हातभार लावण्याची भावना अधिक दृढ असते. तिचे किंवा त्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची तयारी असते. त्याउलट आकर्षणात सारासार विचार हरवला जातो.

हा मेंदूतील (Brain) ‘केमिकल लोच्या’ असतो. ती निसर्गाची एक रचना आहे, जी मान्य करायला हवी, मात्र त्याआधी सारासार विचार जागा ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. ते जमले तर डोळस प्रेम करता येईल. एखाद्या चांगल्या घरातील, सुसंस्कृत मुलीला एखादा छपरी मुलगा कसा काय आवडतो, हा प्रश्‍न अनेकांना पडतो. हाच तो ‘केमिकल लोच्या!’ त्यासाठी आकर्षण आणि प्रेम यातील पुसट रेषेची माहिती हवी. प्रेमात पडताना सारासार विवेक जागा आहे का, हे तपासले पाहिजे. तेवढी जाण नव्या पिढीत जागवली पाहिजे. जी समोरची व्यक्ती आहे, त्यातील दोष मला चालणार आहेत का, हा प्रश्‍न स्वतःला विचारला पाहिजे.

Valentine's Day
Valentine's Day : 'ती'च्या डोळ्यांनी 'तो' अनुभवतो प्रेमाचे रंग; 9 वर्षांच्या संसारात मयुरीची 'दीपक'ला डोळस साथ

तो दारू पितो, मावा खातो, रागीट आहे... पण, मी माझ्या प्रेमाने त्याला बदलेन... हा विचार चुकीचा आहे. या घडामोडींत पालकांची जबाबदारी महत्त्वाची असते. आकर्षण स्वाभाविक आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. लग्न झाल्यावरच प्रेम करा, ही पालकांची अपेक्षा कशी योग्य म्हणता येईल? आकर्षण नैसर्गिक आहे, तेवढेच ‘रिॲलिटी चेक’ म्हणजे वास्तवाचे भान जागे करणे महत्त्वाचे आहे. ते झाले तर प्रेमातील आंधळेपणा कमी होईल, असं स्पष्ट मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. चारुदत्त कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.

योग्यवेळी संवाद अधिक महत्त्वाचा

प्रेम हा सामाजिक चिंतेचा विषय होणे चांगले नाही. मुली मोठ्या होण्याचे वय हे कमी होताना दिसते आहे. अगदी दहा वर्षांची मुलगी मोठी झाली, अशी उदाहरणे आहेत. अनेक मुलांबाबत तेच घडतेय. हे वय आणि प्रत्यक्ष लग्नाचे वय, यामध्ये जो काळ असतो, त्या टप्प्यात शरीर व मनाचे द्वंद्व होत असते. या वयात विरुद्ध लिंगी आकर्षण साहजिक आहे. त्याला प्रेम म्हणायचे का, याची जाणीव या पिढीला नाही. ती करून द्यायला हवी. खरे तर याकडे किचकट प्रश्‍न म्हणून न पाहता, या बदलाला पालक, शिक्षक, समाज यांनी सामंजस्याने हाताळले पाहिजे. पौगंडावस्थेतील ही भावना म्हणजे आंधळेपणा, असा सरधोपट शिक्का मारणेही योग्य नाही.

Valentine's Day
Valentine's Day : 'फूल है गुलाब का, काँटो से क्या डरना..?' असं म्हणायचा काळ गेला; आता नवी पिढी, नवे पर्याय

चांगले काय, वाईट काय याची जाणीव या पिढीमध्ये निर्माण केली पाहिजे. मैत्री, आकर्षण, प्रेम ही प्रक्रिया होत असताना ते माझ्या आयुष्यासाठी योग्य आहे का, याचा विचार करण्याची तयारीच नसणे, याला आंधळेपण म्हटले जाते. मग, डोळस काय, हे कोण सांगणार? त्याची सुरवात योग्य वयात, योग्य पद्धतीने झाली पाहिजे. घडून गेल्यानंतर दोष देण्यापेक्षा योग्यवेळी झालेला संवाद अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, शाळांमध्ये उपक्रम, समुपदेशकांचा सल्ला हे मार्ग योग्य ठरतील.

-अर्चना मुळे, समुपदेशक, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.