Valmiki Jayanti 2024: वाल्मिकी जयंती का साजरी केली जाते अन् महत्त्व काया वाचा सविस्तर

Valmiki Jayanti 2024: यंदा वाल्मिकी जयंती 17 ऑक्टोबरला साजरी केली जात आहे.
Valmiki Jayanti 2024:
Valmiki Jayanti 2024:Sakal
Updated on

Valmiki Jayanti 2024: दरवर्षी शरद पौर्णिमेला महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी केली जाते. यंदा गुरूवारी 17 ऑक्टोबरला महर्षी वाल्मिकी जयंती साजरी केली जाते. त्यांना विद्वता आणि तपश्चर्येमुळे महर्षी ही पदवी मिळाली. वाल्मिकी यांचा जन्मदिवस वाल्मिकी जयंती म्हणून साजरी केली जाते. चला जाणून घेऊया महर्षी वाल्मिकी कोण होते आणि त्यांच्या जयंतीचे महत्त्व काय आहे.

शुभ वेळ

हिंदू पंचांगानुसार, आश्विन महिन्याची पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर रोजी रात्री 08 वाजून 40 मिनिटांनी सुरू झाला असून 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 04 वाजून 55 मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे 17 ऑक्टोबर रोजी वाल्मिकी जयंती साजरी केली जाईल.

Valmiki Jayanti 2024:
Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा गव्हाच्या पिठाचा डोसा, नोट करा चविष्ट-हेल्दी रेसिपी

वाल्मिकी जयंतीचे महत्व

दरवर्षी आश्विन पौर्णिमेला वाल्मिकी जयंती साजरी केली जाते. महर्षी वाल्मिकी प्रभू रामाचे भक्त होते. त्यांनी रामायण लिहिले आहे. वाल्मिकी जयंती सर्वत्र साजरी केली जाते. वाल्मिकी समाजात महर्षी यांना देवाचे रूप मानले जाते आणि या दिवशी त्यांची पूजा केली जाते. आजच्या दिवशी वाल्मिकी यांची मंदिर फुलांनी सजविली जातात.

रामायणाची रचना कशी केली

महर्षी वाल्मिकी यांनी रामायण रचण्यामागे एक पौराणिक कथा आहे. यानुसार वाल्मिकी यांनी ब्रम्हदेवाच्या आदेशानुसार रामायणाची रचना केली. वाल्मिकी यांनी पक्षीची शिकार करणाऱ्या एका शिकाऱ्याला शाप दिला. परंतु या दरम्यान अचानक त्याचा तोंडावरून एक श्लोक निघाला म्हणून आणि ब्रम्हदेव प्रकट झाले. यावर ब्रम्हदेव म्हणाले की माझ्या प्रेरणेनेच तुझ्या मुखातून हा श्लोक निघाला म्हणून तुम्ही प्रभू श्रीरामाला संपूर्ण चरित्र श्लोकांच्या रूपात रचले पाहिजे, असे सागितले. त्यानुसार महर्षी वाल्मिकींनी रामायणाची रचना केली.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.