- डॉ. समीरा गुजर-जोशी
इन्स्टाग्राम किंवा फेसबुक उघडलं, की त्यामधल्या पोस्ट आपल्याला इतरांच्या आयुष्याविषयी खूप काही सांगतात. कोणी नवीन गाडी घेतलेली असते, कोणी परदेशात जाऊन आलेलं असतं, कोणी एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये देखण्या दिसणाऱ्या पदार्थांचे (ज्यांचं नावही आपल्याला माहिती नसतं) फोटो टाकलेले असतात. हे सगळं छानच आहे. आपल्या प्रत्येकाच्याच मनात असं काही करण्याची इच्छा असते हेही तितकंच खरं!