Mirror position as per Vastu in bedroom: आरसा ही एक अशी वस्तू आहे जी आपल्या प्रत्येकाच्या घरात असते. दिवसाची सुरुवातच आरशाने होते. आरसा लावण्यासाठी कोणतीह ठिकाण निश्चित नाही. घराच्या अगदी एटरन्सपासून ते लिव्हिंग रुम आणि बेडरूम तसचं पेसेजमध्येही आरसा लावला जातो.
आरसा हे केवळ आपलं प्रतिबिंब पाहण्यासाठी नसून आरसा लावल्याने घराची शोभा देखील वाढते. वास्तूशास्त्रात आरसा लावण्यासंबधी काही खास नियम आहे. वास्तूशास्त्रानुसार घरात आरसा लावस्यास सकारात्मकता वाढून त्याचा फायदा होतो. Vastu Shastra Marathi Tips right mirror shape and place for mirror in bathroom
घरातील आणखी एक महत्वाचं ठिकाण म्हणजे बाथरुम. बाथरुम किंवा वॉशबेसीनच्या वर अनेक जण आवर्जुन आरसा लावतात मात्र जर तुम्ही वास्तूशास्त्रानुसार योग्य पद्धतीने म्हणजेच योग्य दिशा आणि आकारानुसार बाथरुममध्ये आरसा लावला तर सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होईल. वास्तूशास्त्रानुसार बाथरुममध्ये आरसा लावताना कोणत्या गोष्टीं महत्वाच्या आहेत ते पाहुयात.
बाथरुममधील आरश्यासाठी योग्य दिशा- बाथरुममध्ये Bathroom आरसा लावत असताना सर्वप्रथम दिशा पाहणं गरजेचं आहे. बाथरुममध्ये उत्तर किंवा पूर्वेकडील भिंतीवरच आरसा लावावा. शिवाय मोठ्या आणि जाडजूड फ्रेम असलेला आरसा Mirror न लावता पातळ आणि नाजूक फ्रेम असलेला आरसा लावावा. या फ्रेमचा रंग पांढरा, पिवळा, निळा किंवा चंदेरी असावा.
आरशाची उंची- बाथरुममध्ये आरसा लावत असताना उंचीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अलिकडे अनेक घरांमध्ये टॉयलेट बाथरुम एकत्रित असतं. अशावेळी आरश्याची उंची अशी असावी जेणे करून टॉयलेट सीटवर बसल्यावर तो समोर येऊ नये.
आरशाचा आकार- अलिकडे बाजारात विविध आकाराचे आरसे पाहायला मिळतात. मात्र बाथरुमचा विचार करतावा ऍब्सट्रॅक आकारातील आरशाची निवड करू नये. अलिकडे अशा आरशांचा ट्रेंड असला तरी तो बाथरुममध्य लावणं टाळावं.
बाथरुममध्ये गोलाकार, अंडाकृती किंवा आयताकृती आरशाची निवड करावी. त्यातही जर तुम्हाला हेक्सागन म्हणजेच षटकोन किंवा अष्टकोनी आकाराचा आरसा बाथरुममध्ये लावायचा असेलच तर तो पूर्वेकडील भिंतीवर असेल याची काळजी घ्यावी. right mirror shape for bathroom
हे देखिल वाचा-
रोषणाई असलेला आरसा कुठे असावा?- अलिकडे बाजारात अनेक फॅन्सी आरसे आले आहेत. खास करून बाथरुम आणि वॉशबेसिनसाठी असलेल्या आरशांमध्ये लाइट बसवण्यात आलेली असते. बटन दाबताच ही लाइट ऑन होते.
जर तुम्हाला अशा प्रकारचा लाइट असलेला आरसा बाथरुममध्ये लावायचा असेल तर तो पूर्व आणि उत्तरेलाच असावा. यामुळे सकारात्मकता वाढते. असा आरसा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावल्याच घरात तणाव निर्माण होतो.
आरसा तुटलेला किंवा दोष असलेला नसावा- बाथरुममध्ये लावलेला आरसा हा तुटलेला असू नये याची काळजी घ्यावी. किंवा आरश्याला तडा गेल्यास किंवा त्याचा एखादा कोपरा तुटल्यास तो लगेचच बदलणं गरजेचं आहे. याच प्रकारे आरसा खरेदी करताना तो नीट तपासून घ्यावा.
अनेकदा आरश्यामध्ये काही दोष असतात ज्यामुळे चेहरा खुपच उभट किंवा चपटा दिसतो. यामुळे चेहरा विचित्र दिसतो. म्हणूनच आरशा बारकाईने तपासून खरेदी करणं गरजेचं आहे.
आरसा स्वच्छ ठेवणं गरजेचं- बाथरुममधील आरश्यावर सतत पाणी उडण्याची शक्यता जास्त असते. तो वेळीच स्वच्छ केला नाही तर साबणाच्या पाण्याचे डाग कायम स्वरुपी राहू शकतात. यामुळे कालांतराने आरश्यात धुसर दिसू लागतं. अशा प्रकारचा आरसा बाथरुममध्ये ठेवणं अयोग्य आहे. त्यामुळे आरशा नियमितपणे स्वच्छ करणं गरजेचं आहे. Clean mirror
याशिवाय बाथरुम किवा वॉशबेसिनवरील आरशाखाली टेबल असल्यास तुम्ही आरशाशेजारी काही शोभेची झाडं लावू शकता. यामुळे शोभेसोबतच सकारात्मकता वाढण्यास मदत होते. तसचं आरशाशेदारी किंवा आरशावर एखादी लाईट किंवा सुंदर लॅम्प लावणं हा देखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे कमी उजेड असतानाही आरशात पाहण्यास अडचण होत नाही.
वास्तूशास्त्रानुसार घरात योग्य ठिकाणी आरसे लावल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते. त्याशिवाय धनप्राप्तीसाठी देखील ते लाभदायक ठरू शकतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.